Home /News /videsh /

7.5 रिश्टर स्केल तीव्र झटक्यांनी हादरलं दक्षिण मेक्सिको, 5 जणांचा मृत्यू

7.5 रिश्टर स्केल तीव्र झटक्यांनी हादरलं दक्षिण मेक्सिको, 5 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 30 जण जखमी झाल्याची माहिती. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा.

    मेक्सिको, 24 जून : भूकंपान दक्षिण मेक्सिको पुन्हा एकदा हादरलं आहे. मंगळवारी रात्री 7.5 रिश्टर स्केट भूकंपाचे तीव्र झटके मेक्सिकोमध्ये बसले. अमेरिकेतील द यूएस नेशनल ओसनिक एंड एटमॉस्फेरिक एडमिनिस्ट्रेशनने त्सुनामीचा इशारा दिला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मेक्सिको, दक्षिण मेक्सिको, ग्वाटेमाला, अल साल्वाडोर आणि होंडुरास या भागांमध्ये भूकंपानंतर त्सुनामी येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचे तीव्र झटके बसायला सुरुवात झाल्यानंतर लोक घराबाहेर आले. वीजेचे पोल आणि इमारतीही हादरल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशातील 11 शहरांमध्ये भूकंपाचे झटके बसले तर ओक्साका भूकंपाचा केंद्रबिंदू होता. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: #‎earthquake, Coronavirus, Coronavirus disease, Earthquake, Mexico, Mexico City

    पुढील बातम्या