'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral

'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral

बऱ्याचदा हॉटेल मध्ये गेलं की ऑर्डर देताना आपला बऱ्याचदा गोंधळ उडतो पण ह्यावर एका चायनीज रेस्टोरंटच्या मालकाने एक भन्नाट उपाय शोधलाय. त्यामुळे ह्या हॉटेलचं मेनू कार्ड खुपच Viral होत आहे

  • Share this:

मॉन्ट्रिअल, 20 जानेवारी : चायनीज फूडमध्ये (Chinese Food) विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. अनेकदा आपल्याला याविषयी जास्त माहिती नसते. चिनी व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी हे पदार्थ (Chinese Cusine) नेमके कसे आहेत हे फार गोंधळात टाकणारं असू शकतं. परंतु मेन्यू कार्डवर तुम्हाला यासंदर्भात सर्व माहिती आणि स्पष्टीकरण दिले तर काय होईल? साधारणपणे मेन्यू कार्डमध्ये (Menu Card) पदार्थांची नावे आणि त्यांचे दर दिले जातात. परंतु सध्या एका चायनीज रेस्टोरंटचा मेन्यू सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये पदार्थांच्या नावाबरोबरच त्या पदार्थाविषयी मालकाचे मत देखील दिले आहे. यामुळे तुम्हाला हा पदार्थ कसा आहे आणि खावा की नाही याची माहिती मिळू शकेल.

'Aunt Dai' असे या चायनीज रेस्टोरंटचे नाव असून ट्विटरवर (Twitter) सध्या याचा मेन्यू खूप व्हायरल होत आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी याचे मेन्यू कार्ड शेअर केल्यानंतर हे व्हायरल होत आहे. 'मॉन्ट्रिअलमधील Aunt Dai हे माझे आवडते रेस्टोरंट आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण हा या ठिकाणी असणारा मेन्यू आहे', किम बेलेअर हिने आपल्या ट्विटर अकाउंटवर या संबंधित पोस्ट केली आहे.

या मेन्यूमध्ये प्रत्येक पदार्थांबरोबर मालकाने आपले स्वतःचे मत देखील व्यक्त केलं आहे. यामुळं तुम्हाला याविषयी जाणून घेण्यास मदत होणार आहे. ग्राहकांना या पदार्थांची नावे समजण्यास मदत होण्यासाठी याचे इंग्रजी भाषांतर देखील केले आहे. याचबरोबर हा पदार्थ चवीला किंवा एकंदर कसा आहे याविषयी मालकाने आपल्या शब्दामध्ये याचे वर्णन केलं आहे. त्यामुळे हे मेन्यू कार्ड खूपच व्हायरल होत असून विविध व्यक्तींनी याचे फोटो ट्विट केले आहेत.

ऑरेंज बीफ(Orange Beef) नावाच्या एका डिशसमोर इंग्रजीमध्ये नाव कंसात लिहिले आहे. याचबरोबर फोटोच्या खाली ओनर्स वर्ड म्हणजेच या पदार्थांविषयी मालकाचे मत व्यक्त केलं आहे. या पदार्थाविषयी मालकाने आपले मत व्यक्त करताना आमच्या किचनमधील इतर पदार्थांची तुलना करता हा पदार्थ खूप उत्तम नाही. मी अमेरिकन चायनीजचा (American Chinese) मोठा चाहता नसल्याने हे खावे की नाही हे पूर्णपणे तुम्हाला ठरवायचे आहे. असे प्रामाणिक मत यामध्ये देण्यात आलं आहे. अमेरिकेत चायनिज खाद्यपदार्थ लोकप्रिय नसणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. भारतीयांनी ज्या पद्धतीने आपल्या आवडीनुसार चायनीज पदार्थांमध्ये भारतीय प्रकार तयार केले आहेत त्याच पद्धतीने अमेरिकेत आणि कॅनडामध्ये देखील चायनीजमध्ये बदल केले आहेत.

(हे वाचा - कशाला हवं Diet food; इंडियन फूड खाऊनच कमी होईल तुमचं वजन)

अशा अनेक पदार्थांबाबत मालकाने त्याचं प्रांजळ मत मांडलं आहे. 'Satay sauce beef' नावाच्या पदार्थांविषयी देखील मालकाने अतिशय प्रामाणिकपणे आपलं मत मांडल आहे. हा पदार्थ मी अजूनपर्यंत खाल्ला नसून आमच्या रेस्टॉरंटमधील हा सर्वात लोकप्रिय पदार्थ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. याचबरोबर मला माझ्या रेस्टॉरंटमध्ये अधिक खाण्याची गरज असल्याची देखील त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर बटाटा, व्हिनेगर आणि मिरच्या वापरून तयार केलेल्या पदार्थांविषयी त्याने आपलं मत मांडलं. फ्रेंच फ्राईज व्यतिरिक्त खूप डिश असल्याचे देखील तो यामध्ये म्हणतो.

याचबरोबर एका नूडल्सच्या पदार्थाविषयी आपलं मत व्यक्त करताना ही करी फ्लेवरची असल्याने जास्त चवीची अपेक्षा नका करू असं प्रामाणिक मत मांडतो. यामुळे हे मेन्यू कार्ड खूपच व्हायरल होत आहे.

दरम्यान, ट्विटरवरील हे फोटो वेगाने व्हायरल होत असून आतार्यंत 72 हजार जणांनी याला लाईक्स आणि रिट्विट केलं आहे. याचबरोबर अनेकजण या अनोख्या मेन्यूवर आपले मत मांडत प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत.

Published by: Aditya Thube
First published: January 20, 2021, 6:38 PM IST

ताज्या बातम्या