मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

धक्कादायक खुलासा: T 20 वर्ल्ड कप फायनलमधल्या 86 हजार प्रेक्षकांमध्ये होता ‘कोरोना’चा रुग्ण

धक्कादायक खुलासा: T 20 वर्ल्ड कप फायनलमधल्या 86 हजार प्रेक्षकांमध्ये होता ‘कोरोना’चा रुग्ण

Melbourne: Fans nearly fill the Melbourne Cricket Ground during the Women's T20 World Cup cricket final match between Australia and India in Melbourne, Sunday, March 8, 2020. AP/PTI(AP08-03-2020_000103B)

Melbourne: Fans nearly fill the Melbourne Cricket Ground during the Women's T20 World Cup cricket final match between Australia and India in Melbourne, Sunday, March 8, 2020. AP/PTI(AP08-03-2020_000103B)

मेलबॉनच्या क्रिकेट स्टेडियमवर रविवारी प्रेक्षकांमध्ये तब्बल 86174 लोक होते.

  • Published by:  Ajay Kautikwar

मेलबर्न 12 मार्च :  जगभर कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आलीय. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथं T 20 वर्ल्ड कप फायनल स्पर्धा झाली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी 80 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते. यात एक जण कोरोनाचा रुग्ण होता अशी माहिती पुढे आलीय. एका टेस्टमध्ये हा रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे सरकारच्या तोंडचं पाणी पळालं आहे. प्रेक्षकांमध्ये 86174 लोक होते. आज हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाळा इथं भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन वन डे मॅचमधला पहिला सामना खेळला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान,  भारतातही कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी केरळमध्ये गेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने कडक पाऊल उचलण्यात सुरुवात केली आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकाने व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे. 13 मार्च मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

केंद्र सरकारने  कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे.  पुढील महिन्यात 15 एप्रिल पर्यंत भारताचा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामध्ये डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, यूएन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

महाराष्ट्रातल्या तरुणांचं 'जय जवान',  तीन वर्षात 11 हजर तरुण लष्कारत दाखल

15 फेब्रुवरी 2020 नंतर चीन, इटली, इराण, कोरिया गणराज्य, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये गेलेल्या भारतीयांसह येणाऱ्या सर्व पर्यटकांना 14 दिवस वैद्यकीय तपासणीच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार पसरला असताना व्यावसायासोबतच शेअर मार्केवरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये घसरण होत आहे. आज सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी घसरला असून निफ्टी 700 अंकानी घसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील (Share Market) चिंता वाढत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) मोठ्या म्हणजे तब्बल 1600 अंकानी गडगडला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही (Nifty) 470 अंकाची घसरण झाली आहे.

यांना जरा समजवा...कोरोना टेस्ट केंद्र उभारण्यास विरोध, सोलापुरात नागरीक आक्रमक

अमेरिकेतील बाजाराताही कोरोनाची भीती आहे. कालच्या बाजारात Dow 1460 अंकांनी घसरला होता. Nasdaq आणि S&P 500 ही 5 टक्क्यांपर्यंत घसरला. मार्च 2017 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजाराच्या खाली आला आहे. 40 हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये 33 हजारापर्यंत घसरण झाली आहे.

First published:

Tags: Corona virus