लंडन, 01 जुलै : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन (lockdown) लागू केला आहे. सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन कामासाठीही बाहेर पडणं अशक्य झालं आहे. अशात आता महापौरांनीच (mayor) फक्त आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांना आता टीकेला सामोरं जावं लागत आहे.
लिसेस्टर सिटीचे महापौर सर पीटर सोल्सबी (Sir Peter Soulsby) यांनी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे. 71 वर्षांचे सर पीटर हे लेबर पार्टीचे महापौर आहेत. त्यांची 64 वर्षीय गर्लफ्रेंड समर्सलँडच्या घरी ते येताजाताना दिसले. ते फक्त तिला भेटायला येत नसत तर रात्रभर तिथंच राहत असतं. असं एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 2 महिने त्यांनी केलं. एप्रिल आणि मे महिन्यात सोल्सबी समर्सलँडच्या घरी वारंवार येत असल्याचं दिसलं. तिच्या घराची डागडुजीही त्यांनी केली. समर्सलँडच्या शेजाऱ्यांनी महापौर तिच्या घरी येत असल्याचं पाहिलं होतं.
हे वाचा - पंतप्रधान मोदी यांनी सोडलं 'हे' चायनीज APP, दोन सोडून सगळ्या पोस्ट केल्या Delete
शेजाऱ्यांनी तर याचे फोटोही काढले. एका फोटोत तर सॉल्सबी आपल्या गर्लफ्रेंडच्या घराच्या खिडकीजवळ शिडी लावून उभे होते. या फोटोत ते आपल्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असल्याचं दिसतं.
विशेष म्हणजे लेबर पार्टीचे नेते पूर्ण मे महिना आपल्या सोशल मीडियावर लोकांना घरी सुरक्षित राहण्याचा संदेश देत होते आणि तेच आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जात होते. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यानंतर पोलिसांनी महापौरांना समज दिली. महापौरांनी आपल्याच घरी राहवं असं पोलिसांनी त्यांना सांगितलं.
हे वाचा - '...तर दिवसाला रोज 1 लाख नवीन रुग्ण सापडतील', कोरोना तज्ज्ञांनी दिला इशारा
दरम्यान प्रसारमाध्यमांनी सोल्सबी यांना याबाबत विचारणा केली, त्यावेळी ते म्हणाले, "माझ्या अशा व्यवहारामुळे कुणाला कोरोनाव्हायरसची लागण होऊ शकते असा दावा कुणी करू शकेल, असं मला वाटत नाही. मी जे काही केलं ते लॉकडाऊनच्या आत्म्याविरोधात नक्कीच आहे मात्र नियमांच्याविरोधात अजिबात नाही"
संकलन, संपादन - प्रिया लाड