वाचा-समुद्र किनाऱ्यावर सापडला 15 फूटी लांब मृतदेह, रहस्यमय PHOTO पाहून लोक हादरले जगन्नाथ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत घेतली आहे. पर्यावरण संरक्षणाचे काम करणारे ग्रीनपीस यांचे म्हणणे आहे की, यामुळे मॉरिशसमध्ये आतापर्यंतचे सर्वात भयावह पर्यावरण संकट निर्माण होईल. यामुळे सागरी प्राणी तसेच पर्यावरणाला मोठा धोका आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सॅलेटाइट फोटोमध्ये काळ्या समुद्रावर तेल पसरताना दिसत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की त्यांचा देश मॉरिशसच्या मदतीसाठी विशेष पथके आणि उपकरणे पाठवित आहे. मॉरिशसजवळ फ्रान्समधील रियुनियन बेट आहे. वाचा-खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून घसरली 5 वर्षांची चिमुरडी, खाली पडणार तेवढ्यात... हजारो स्थानिक लोक करत आहेत मदत दरम्यान, सध्या हजारो स्थानिक लोक तेल साफ करण्यासाठी मदत करत आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, रविवारी प्रिन्सटन बीच व आजूबाजूच्या परिसरातील समुद्रकिनारा साफसफाईसाठी हजारो सामान्य लोक सामील झाले. दुसरीकडे जपानने म्हटले आहे की ते टँकरमधून होणारी गळती थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार टँकरला वाचविणे जवळजवळ अशक्य आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता अधिक आहे. पीएम जगन्नाथ म्हणाले की, टँकर पूर्णपणे पाण्यात बुडाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल आणि समुद्रकिनार्यांवर तेल जास्त गोळा केले जाईल.Volunteers in Mauritius are scrambling to create cordons to keep leaking oil away from the island after a tanker ran aground on a coral reefhttps://t.co/GrmfLi0vPo pic.twitter.com/BIEW8NPBQx
— BBC News (World) (@BBCWorld) August 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.