World’s Coolest Job: जगभर फिरा, राहण्यासाठी आलिशान घर, पगार 25 लाख.. हवी ही पात्रता!

जाणून घ्या जगातील सर्वात सुपर कुल जॉब संदर्भात...

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 04:28 PM IST

World’s Coolest Job: जगभर फिरा, राहण्यासाठी आलिशान घर, पगार 25 लाख.. हवी ही पात्रता!

सिडनी, 10 एप्रिल: प्रत्येक दिवशी नव्या नव्या ठिकाणी फिरायचे, राहण्यासाठी घर या सर्व सुविधा देणाऱ्या एका नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. होय अनेकांना विश्वास बसणार नाही अशा या नोकरीसाठी सध्या जगभरातून अर्ज येत आहेत. जाणून घ्या या सुपर कुल जॉब संदर्भात...

ई-कॉमर्समधील उद्योगपती आणि अब्जावधीची मालमत्ता असलेल्या मॅथ्यू लेपर यांना एका पर्सनल असिस्टंटची गरज आहे. ही व्यक्ती त्यांच्या टीमला मॅनेज करणारी हवी. यासाठी त्यांनी जगभरातून अर्ज मागवले आहेत. मॅथ्यू यांनी या नोकरीसाठी महिन्याला 25.75 लाख रुपये पगार देणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय अन्य आरोग्य विषयक सुविधा आणि प्रवासाचा भत्ता देखील दिला जाणार आहे. यासंदर्भातील जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी World's Coolest Job असा शब्द वापरला आहे.


26 वर्षीय मॅथ्यू यांच्या ई-कॉमर्सच्या 4 कंपन्या आहेत. त्याच्यासोबत राहण्यासाठी आणि त्याच्या टीमला मदत करणारी एक स्मार्ट व्यक्तीच्या ते शोधत आहेत. मॅथ्यू यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर यासाठी जगभरातून 40 हजार लोकांनी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे अर्ज करणाऱ्यांपैकी 75 टक्के या महिला असून त्या 23 ते 37 या वयोगटातील आहेत.

View this post on Instagram

It’s crazy, everything I ever visualised is coming to reality. The lifestyle, the business, the ability to give back and inspire people to reach their goals. 〰️ Literally 3 years ago, I made the decision that I wasn’t going to be another number in the system that our generation is brought up in. I dropped out of University and was left with a 40k student debt. 〰️ My point is, that a lot can happen in a few years. Don’t judge yourself for where you’re at or where you’ve been. Only where you’re going! 〰️ And yea, ask more from life because seriously… you can manifest anything you want if you become clear on your dreams and match this with a ridiculous work ethic.
〰️
Dream (and eat) bigger. 🙏

A post shared by Matthew Lepre (@matthewlepre) on


Loading...

नोकरी मिळवण्यासाठी या आहेत अटी

मॅथ्यू यांनी डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संबंधित व्यक्तीला उत्तमपणे संगणक चालवता आला पाहिजे. ती व्यक्ती सोशल मीडिया एक्स्पर्ट हवी. तसेच त्याला नव्या गोष्टी शिकण्याची आवड हवी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मी काय करतोय हे माहीत हवे. त्यासाठी त्याने माझे यूट्यूब चॅनल बघावे.


VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...