Home /News /videsh /

पाकिस्ताननं दिली या नागरिकाच्या हत्येची सुपारी? कारण वाचून बसेल धक्का

पाकिस्ताननं दिली या नागरिकाच्या हत्येची सुपारी? कारण वाचून बसेल धक्का

आपल्यावरील हल्ल्यामागे पाकिस्तान सरकारचा हात असून पाकिस्ताननंच त्याला मारण्याची सुपारी दिल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे

लंडन, 29 जानेवारी: शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये (Pakistan) कायम अस्थिर स्थिती असते. या अस्थिरतेविरोधात जर नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आवाज दडपून टाकल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पाकिस्तान सरकार आणि लष्कर फक्त देशात राहणाऱ्याच नाही तर देशाबाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनासुद्धा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. पाकिस्तान सरकार (Pakistan Government) आणि लष्कराविरोधात (Pakistan Military) बोलल्यामुळे एका ब्लॉगरचा जीव धोक्यात आल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला पण, तो त्यातून बचावला. आपल्यावरील हल्ल्यामागे पाकिस्तान सरकारचा हात असून पाकिस्ताननंच त्याला मारण्याची सुपारी (Contract) दिल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. अहमद वकास गोराया (Ahmad Waqass Goraya), असं या पाकिस्तानी ब्लॉगरचं नाव असून तो आपल्या कुटुंबासह नेदरलँडमध्ये (Netherlands) राहतो. अहमद वकास गोराया यानी आपल्या काही सोशल मीडिया पोस्टमध्ये (Social Media Post) पाकिस्तान सरकार आणि लष्करावर टीका केली होती. यानंतर त्याच्या हत्येचा कट (Murder Planning) रचण्यात आला. नेदरलँडमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 31 वर्षीय ब्रिटिश-पाकिस्तानी व्यक्ती मोहम्मद गोहीर खान याला अटक केली होती. चौकशी एजन्सीनं न्यायालयाला सांगितलं की, गेल्या (2021) वर्षीच्या सुरुवातीला मुझ्झमिल नावाच्या पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीने खानसोबत संपर्क साधला होता. त्या व्यक्तीनं ब्लॉगरला मारण्याची सुपारी दिली होती. हे वाचा-त्या भारतीयाला पाकने दिला व्हिसा, फाळणीवेळी ताटातूट पण 74 वर्षांनी झाली होती भेट WION या वेबसाइटनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या न्यायालयानं पूर्व लंडनमधील एका सुपर मार्केटमध्ये काम करणाऱ्या 31 वर्षीय मोहम्मद गोहीर खानला या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. खान याच्यावर अहमद वकास गोराया यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. खानला 11 मार्च 22 रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असं म्हटलं जात आहे. मोहम्मद गोहिर खान यानं ब्लॉगरच्या हत्येसाठी 5 हजार पाउंड अॅडव्हान्स घेतल्याचंही तपासात उघड झालं आहे. ही रक्कम मुझ्झमिलच्या पाकिस्तानी बँक खात्यातून देण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर खानला आणखी 80 हजार पाउंड मिळणार होते. पोलीस चौकशीदरम्यान, आपल्याला सुपारी मिळाल्याचं खाननं कबूल केलं आहे. सुपारी जरी मिळाली असली तरी खून करण्याचा आपला अजिबात हेतू नव्हता, असंही खाननं सांगितलं आहे. हे वाचा-14 वर्षांच्या मुलाला PUBG चं वेडं; आई-बहिणीसह संपूर्ण कुटुंबाची गोळी घालून हत्या आपल्या हत्येची सुपारी देणाऱ्या मास्टरमाईंडपर्यंत (Mastermind) पोलीस पोहोचू शकले नाहीत, अशी खंत ब्लॉगर अहमद वकास गोराया याने व्यक्त केली. या षड्यंत्रामागे पाकिस्तानचाच हात असल्याचंही तो म्हणाला. अहमद गोराया याच्यावर हल्ला झाल्यापासून मोहम्मद खानचा आणखी एक साथीदार गायब आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
First published:

Tags: Pakistan, Pakistan army

पुढील बातम्या