अंटार्टिकात तुटलाय हिमखंड

दिल्लीहून 4पट मोठा, गोव्याहून दीडपट मोठा आणि इंडोनेशिया बेटाच्या आकाराचा बर्फाचा तुकडा अंटार्टिकात तयार झालाय. चवथा मोठा हिमपर्वत असलेल्या 'लार्सेन सी'चा हा तुकडा एक भाग होता.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2017 02:15 PM IST

अंटार्टिकात तुटलाय हिमखंड

13जुलै: दिल्लीहून 4पट मोठा, गोव्याहून दीडपट मोठा आणि  इंडोनेशिया बेटाच्या आकाराचा बर्फाचा तुकडा अंटार्टिकात तयार झालाय. 'ब्रिटिश अंटार्टिक सर्व्हे'नुसार 10 ते 12 जुलै दरम्यान तुटला असून याचं नाव  'ए68' ठेवण्यात आलंय. या महाकाय तुकड्याचं क्षेत्रफळ 5800चौरस किलोमीटर इतकं आहे.

कसा तयार झाला हा तुकडा?

अंटार्टिकामध्ये अनेक बर्फाचे पर्वत आहेत.या हिमपर्वतांमधला चवथा मोठा हिमपर्वत  असलेल्या  'लार्सेन सी'चा हा तुकडा एक भाग होता. लार्सेन सीहून वेगळा होऊन हा तुकडा तयार झालाय.

का झाला हा तुकडा विलग?

जगात कार्बनचं उत्सर्जन वाढलंय. त्यामुळे जगाच तापमान वाढतंय. तापमान वाढीमुळे ग्लेशिअर्स लवकर वितळतात. त्यामुळेच लान्स सीचा हा तुकडा पडल्याचं म्हटलं जातंय

Loading...

याचा जगावर परिणाम काय?

या घटनेचे जागतिक पर्यावरणावर परिणाम होतील. शास्त्रज्ञांच्या मते  सागराची उंची 10से.मी.ने वाढेल. लार्सेन सी हा हिमपर्वत लवकर वितळेल. भारतावर सध्या तरी याचा काही परिणाम होणार नाही.

या हिमखंडाचं पुढे काय होईल?

या हिमखंडाचे अजूनही तुकडे होऊ शकतात. किंवा तो  असाही   तरंगत राहू शकतो. पुढेही जाऊ शकतो. सध्यातरी शास्त्रज्ञ या तुकड्यावर लक्ष ठेवणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...