Home /News /videsh /

शारजाहच्या 48 मजली आलिशान इमारतीला भीषण आग, थरारक VIDEO आला समोर

शारजाहच्या 48 मजली आलिशान इमारतीला भीषण आग, थरारक VIDEO आला समोर

या अपघाता सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आग एवढी भीषण होती, ही संपूर्ण शहर लाल झाल्यासारखे दिसत होते.

    शारजाह, 06 मे : संयुक्त अरब अमिरातीच्या दुबईच्या शारजाह येथील एका मल्टिस्टोरी इमारतीत मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली .हा अपघात अल नहदा भागात झाला. प्राप्त माहितीनुसार, इमारतीच्या सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाता सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आग एवढी भीषण होती, ही संपूर्ण शहर लाल झाल्यासारखे दिसत होते. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, अल नाहदा परिसरातील अबको टॉवर इमारतीत हा अपघात झाला. त्यात पार्किंग व्यतिरिक्त 47 मजले आहेत. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ गाठले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आग विझविण्याचे काम सकाळी 7 पर्यंत सुरू होते. दरम्यान ही आग कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकले नाही. वाचा-किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत संशय कायम? 'तो' VIDEO खोटा असल्याची माहिती लीक वाचा-डॉक्टरांनी घरी पाठवलं म्हणून मस्त क्रिकेट खेळला, नातेवाईकांनाही भेटला आणि आता... स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध ताज बंगळुरु रेस्टॉरंटच्या शेजारच्या इमारतीत हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात अद्याप जीवितहानीची हानी झाल्याची नोंद नाही आहे. दरम्यान या इमारतीमध्ये 250 रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. वाचा-घर घेण्याचं स्वप्न लॉकडाऊन नंतर होईल पूर्ण,वाचा फ्लॅट्स स्वस्त होण्याची कारणं शारजाह हे संयुक्त अरब अमिरातीमधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या