कराचीमध्ये मोठा ब्लास्ट, इमारतीचे 2 मजलेच झाले गायब; पाहा भीषण स्फोटाचा VIDEO

कराचीमध्ये मोठा ब्लास्ट, इमारतीचे 2 मजलेच झाले गायब; पाहा भीषण स्फोटाचा VIDEO

अद्याप स्फोटाचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, मुलिना टाऊन पोलिसांच्या मते हा सिलिंडरचा स्फोट असू शकतो.

  • Share this:

कराची, 21 ऑक्टोबर : पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. गुलशन-ए-इक्बालमध्ये मस्कन या चौरंगी दुमजली इमारतीत स्फोट होऊन अनेक लोक जखमी झाले आहे. आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्याही मोडकळीस आल्या आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉनच्या मते, या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व जखमी आणि मृतांना पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप स्फोटाचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, मुलिना टाऊन पोलिसांच्या मते हा सिलिंडरचा स्फोट असू शकतो.

वाचा-पाकिस्तानमध्ये सिविल वॉर? पोलिसांचे सैन्याविरुद्ध बंड; 10 पोलिसांचा मृत्यू

वाचा-इथे महिला कैद्यांवर होतो बलात्कार; जेलमधलं भयंकर वास्तव एका रिपोर्टमधून आलं समोर

बचाव अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा परिसर सध्या बंद केला आहे. हा स्फोट इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर झाल्याचा संशय आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आसपासच्या इमारतींच्या खिडक्यांबरोबरच काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान या स्फोटोमुळे जवळजवळ एक किमीपर्यंतचा परिसर हादरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचा-झोपेच्या औषधाची कमाल! 8 वर्षे हलू-बोलू न शकणारी व्यक्ती 20 मिनिटांतच बरी झाली

दरम्यान, मंगळवारी कराचीमधील शिरीन जिन्ना कॉलनीजवळील बस टर्मिनलच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्बचा स्फोट झाल्याने पाच जण जखमी झाले. टर्मिनलच्या गेटवर लावलेले आयईडी होते, असे पोलीसांनी सांगितले. दुपारी साडेतीन नंतर आयईडी लावण्यात आला. या स्फोटात पाच लोक जखमी झाले.

Published by: Priyanka Gawde
First published: October 21, 2020, 12:55 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या