जगातील अनेक देशात सायबर हल्ले, हॅकर्सकडून खंडणीची मागणी

जगातील अनेक देशात सायबर हल्ले, हॅकर्सकडून खंडणीची मागणी

  • Share this:

अमेय चुंभळे, मुंबई

13 मे : जगात शुक्रवारी एक भीषण हल्ला झाला. त्यातून कोट्यवधींचं नुकसानही झालं. पण हा दहशतवादी हल्ला किंवा बॉम्ब हल्ला नव्हता, तर हा होता सायबर हल्ला. जगातले हजारो कॉम्प्युटर लोकांना वापरताच येईना. त्यातली माहिती लीक झाली.

कॉम्प्युटर हा आधुनिक जगातला सर्वात महत्त्वाचा शोध. सगळं जग एकाच क्लिकवर, बँका, हॉस्पिटल्स, पेमेंट, चित्रपट, गाणी... सर्वकाही याच्यावर स्टोर आहे. पण ते चोरायचा प्रयत्न झाला तर? झाला तर नव्हे, तसं झालं शुक्रवारी. जगावर मोठा सायबर हल्ला झाला. हजारो कॉम्प्युटर हॅक झाले. हॅक म्हणजे कॉम्प्युटरमधल्या डेटाची चोरी. एवढचं नाही तर हॅकर्सनी संस्था आणि लोकांकडे खंडणीचीही मागणी केली. कम्प्युटर्सच्या स्क्रिनवरत्यांनी फोटो पोस्ट करत 300 ते 600 अमेरिकन डॉलर्सची मागणी केली. अनेकांनी ते दिलेही, पण याचे परिणाम भयंकर झाले.

सर्वात आधी याला बळी पडली ती ब्रिटनची आरोग्य व्यवस्था. अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे कॉम्प्युटर्स हॅक झाले. डॉक्टर्सना पेशंटची केस हिस्ट्री पाहता येईना.. मग त्यांच्यावर उपचार तरी कसे करणार? हजारो रुग्णांना घरी पाठवावं लागलं. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती, त्यांचे केस पेपर्स मागवावे लागले. इतकच नाही, अनेक आफ्रिकन देशांमध्ये मोबाईल नेटवर्क कोसळले. रेल्वे प्रणाली बंद पडली. काही बँकांचे नेटवर्क्सही हॅक झाल्याने पैसेही काढता येईना.

तर या हल्ल्याचा सर्वात मोठा बळी ठरला तो युरोप. त्याच्या पाठोपाठ चीन, हाँग-काँग, रशिया, भारत, दक्षिण अमेरिका आणि अमेरिका. आता याचे परिणाम कमी झाले आहेत, पण जे झालं ते भयानक होतं. एखाद्या रुग्णाची वैद्यकीय हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागणं, किंवा एका मोठ्या कंपनीची गुप्त माहिती लीक होणं, शाॅपिंग वेबसाईटवर सेव केलेले तुमचे कार्ड डिटेल्स लीक होणं, पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्लॅन शत्रूच्या हाती लागणं... हा कल्पनाविलास नाही तर वास्तव आहे, आणि शक्य आहे. भयंकर आहे.

पण इतक्या मोठ्या प्रमाणावर हॅक करायचं तंज्ञत्रान हॅकर्सकडे आलं कुठून?

अमेरिकेकडून. होय. शत्रूराष्ट्राचं कॉम्प्युटर नेटवर्क हॅक करायची वेळ आली तर, यासाठी अमेरिकन सरकारनंच ही सायबर शस्त्र बनवून ठेवली आहेत. त्यातलं एक शस्त्र हॅकर्सच्या हाती लागलं आणि मग हा गहजब झाला. यावरून एक गोष्ट अधोरेखित होते ती की कॉम्प्युटर तंज्ञत्रान कितीही पुढे गेलं, तरी ते किती तकलादू आहे. त्याचा गैरवापर किती सोपा आहे. यावर तुमच्या आमच्यासारख्याला करता काहीच येणार नाहीय.. परिस्थितीचं गंभीर्य लक्षात यावं म्हणून सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 03:19 PM IST

ताज्या बातम्या