News18 Lokmat

अमेरिका गोळीबाराच्या घटनेनं हादरली, १३ जणांचा मृत्यू

या बंदुकधाऱ्यानं आधी बारच्या दारात उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आत घुसून त्यानं गर्दीवर गोळीबार केला.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2018 08:17 PM IST

अमेरिका गोळीबाराच्या घटनेनं हादरली, १३ जणांचा मृत्यू


08 नोव्हेंबर : अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरला. कॅलिफोर्नियात एका बारमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात हल्लेखोरासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कॅलिफोर्नियातील थाउजंड ओक्स येथील बार्डरलाइम बार अँड ग्रलमध्ये घडली.


या बंदुकधाऱ्यानं आधी बारच्या दारात उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर आत घुसून त्यानं गर्दीवर गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनं लोकांमध्ये भीतीची लाट पसरली आणि लोक सैरावरा धावू लागले. त्यातही काही लोकं जखमी झाले.


Loading...

पोलीस बारमध्ये पोहोचेपर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला होता तर हल्लेखोरही मृत्युमुखी पडले होते. हल्लेखोर कसा ठार झाला, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.

बारमध्ये शेकडो जण होते. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हाही गोळीबार सुरूच होता. बारमधील काही लोकांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांना याबद्दल माहिती दिली. एक व्यक्ती चेहऱ्यावर कापड गुंडाळून आला होता आधी त्याने गेटवर असलेल्या व्यक्तीला गोळी झाडली त्यानंतर बारमध्ये गर्दीवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारमध्ये गोळीबाराची घटना रात्री ११ वाजून २० मिनिटाने घडल्याची माहिती मिळाली होती. थाउजंड ओक्स बार हा लॉस एंजिलिसपासून जवळपास 40 किलोमिटर दूर आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...