मार्क झुकरबर्गने वर्तमानपत्रातून मागितली ब्रिटीश नागरिकांची जाहीर माफी

मार्क झुकरबर्गने  वर्तमानपत्रातून मागितली ब्रिटीश नागरिकांची जाहीर माफी

काही दिवसांपूर्वी 5 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली. लंडनमधील केंब्रिज अनॅलिटीका या कंपनीकरवी ही चोरी झाल्याचं स्पष्ट झालंय

  • Share this:

25 मार्च: फेसबुकचे  संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने  ब्रिटीश नागरिकांचा विश्वासघात केल्या प्रकरणी ब्रिटनच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून मोठी जाहिरात देऊन जाहीर माफी  मागितली आहे. 5 कोटी लोकांचा डेटा फेसबुकवरून चोरीला गेल्याप्रकरणी ही माफी त्यांनी मागितली आहे.

काही दिवसांपूर्वी 5 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली. लंडनमधील केंब्रिज अनॅलिटीका या कंपनीकरवी ही चोरी झाल्याचं स्पष्ट झालंय  अमेरिकेच्या  2016 साली  झालेल्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात डेटा चोरी झाल्याचं समोर आलं होतं. ही बातमी समोर आल्यानंतर फेसबुकला 6.6 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं . फेसबुकचे  शेअर्स कमालीचे घसरले. या साऱ्याच्या पार्श्नभूमीवर ही जाहीर माफी मार्कने मागितली आहे. आपल्यकडून लोकांचा विश्वासघात झाल्याबद्दल ही मागणी मागितली गेली आहे कारण ही सगळी डेटा चोरी फेसबुकवरून झाली आहे. यापुढे आपण असं होणार नाही याची काळजी घेऊ  आणि यापुढेही आपल्यासोबत रहा अशी मागणीही त्याने या माफीनाम्यात केली आहे. ब्रिटनच्या काही महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी झळकली आहे

 

First published: March 25, 2018, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading