झुकरबर्गला कन्यारत्न, नाव ठेवलं 'ऑगस्टा'

झुकरबर्गला कन्यारत्न, नाव ठेवलं 'ऑगस्टा'

या मुलीचं नाव झुकरबर्गने ऑगस्टा ठेवलं असून त्याने तिला फेसबुकवर एक 'ओपन लेटर'ही लिहिलं आहे.

  • Share this:

29 ऑगस्ट: तब्बल 2 अब्जाहून जास्त युजर्स असणाऱ्या फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचं नाव झुकरबर्गने ऑगस्टा ठेवलं असून त्याने तिला फेसबुकवर एक 'ओपन लेटर'ही लिहिलं आहे.

या पत्रात त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. तू खूप लवकर मोठी होऊ नकोस असंही तो म्हणतोय. त्याने जगात तिचं स्वागतही केलंय, पण त्यातही जगाच्या वास्तवाची कल्पनाही दिली आहे. झुकरबर्ग या पत्रात पुढे म्हणतो की बालपण जादुई असतं आणि ते एकदाच मिळतं त्यामुळे ते पूर्णपणे जगून घे. तसंच झुकरबर्ग दाम्पत्य तिच्या संगोपनासाठी प्रचंड उत्सुक आणि आनंदी असल्याचंही या पत्रात म्हटलंय. मार्क झुकरबर्ग आता ऑगस्टासाठी दोन महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह घेणार असल्याचीही माहिती मिळते आहे.

ऑगस्टासाठी झुकरबर्ग कुटुंबावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

First published: August 29, 2017, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading