S M L

ऑस्ट्रेलियातल्या 'या' शहरात शिकवली जाते मराठी

ऑस्टोलियातील या शहरातल्या पाच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जातेय.मराठी संस्कृती जपण्यासाठी इथे प्रयत्न केला जातोय

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 11:51 AM IST

ऑस्ट्रेलियातल्या 'या' शहरात शिकवली जाते मराठी

25 सप्टेंबर : एकीकडे राज्यात मराठी शाळा बंद पडत असताना दुसरीकडे परदेशातही मराठीचं शिक्षण दिलं जातंय. ऑस्ट्रेलियासारख्या देशात मराठी शिकवलं जातं आहे.

ऑस्टोलियातील नॉर्थ शोअर या शहरातल्या पाच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जातेय.मराठी संस्कृती जपण्यासाठी इथे प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातील जांभुळदरा भाम. ही शाळा जगाशी कनेक्ट रहावी यासाठी इथल्या विभुते सरांनी जगातील मराठी शाळांचा शोध घेतला. व्हाट्सअॅप ग्रुप तयार करुन त्या मुलांचा संवाद आपल्या ग्रामिण भागातील मुलांशी करुन दिला. या शोधातच ऑस्ट्रेलियाच्या मराठी शाळेचा या प्राथमिक शाळेशी संपर्क झाला

अनेकदा ग्रामिण भागातील मुलांना आपलं गाव सोडुन बाहेर काय चाललं आहे हे माहित नसतं. पण आता या छोट्याशा गावातील विद्यार्थांचा संवाद थेट ऑस्टोलियातील मुलांशी होतोय. तसंच ऑस्ट्रेलियातही मराठी शिकवली जात असल्यामुळे जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे तिथे मराठी संस्कृती जोपासली जाते आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 11:51 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close