इस्तंबुल, 26 फेब्रुवारी : तुर्की एअरलाइन्समधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एका तरुणाला बनावट पासपोर्ट बाळगल्य़ा प्रकरणी प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून कॅमरूनला पाठवून देण्यात आलं आहे. या तरुणाला जबरदस्ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणा जोरजोरात ओरडताना दिसत आहे. एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी या तरुणाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून पुन्हा पाठवून दिलं आहे. विमानातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे अधिकारी मला मारण्यासाठी अशा पद्धतीचं वर्तन करत आहेत. शरीरावर घट्ट पिशवी गुंडाळ्यानं मला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे असं हा तरुण या व्हिडिओमध्ये ओरडताना दिसतंय. व्हिडिओमध्ये प्लास्टिकने गुंडाळलेल्या तरुणाचं नाव इमॅनुअल चेडो असल्याचं सांगितलं जात आहे. 47 वर्षांचे चेडो कामानिमित्तानं इस्तंबुलहून दुबाईसाठी जात असताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे. इस्तंबुल विमानतळावर विमान येण्याआधी ते फेरफटका मारत होते तेव्हा त्यांना तिथल्या काही अधिकाऱ्यांनी पकडलं आणि बनावट पासपोर्ट असल्याचा आरोप केला आणि त्यांचं कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ताब्यात घेतलं.
हेही वाचा-'कमल हसन यांनी मला जबरदस्तीनं KISS केलं होतं', अभिनेत्री रेखा यांचा आरोप
Turkish Airlines pic.twitter.com/mms78x12Zu
— . . (@ThierryJFT) February 24, 2020
To all my dear followers, this will be my last tweet ! I said enough. Good luck to everyone. Thierry
— . . (@ThierryJFT) February 25, 2020
अधिकाऱ्यांनी मला एका खोलीत नेलं तिथे पहिल्यापासूनच सामान पॅक करण्यासाठी असलेलं प्लास्टिक होतं. त्यांनी मला पकडून त्या प्लास्टिकमध्ये पॅक करण्यास सुरुवात केली. कामानिमित्तानं मला दुबईला अर्टेंट जायचं होतं. मात्र त्यांनी मला कॅमरूनला पाठवून दिलं असं इमॅनुअल चेडो यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी आता तुर्की एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांवर काही कारवाई होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा-Delhi Violence: दंगेखोरांनी केली IB कॉन्स्टेबलची हत्या, नाल्यात फेकला मृतदेह