Home /News /videsh /

अरे देवा! कोरोना व्हायरसला मारण्यासाठी पठ्ठ्याने वॉशिंग मशिनमध्येच धुतल्या नोटा

अरे देवा! कोरोना व्हायरसला मारण्यासाठी पठ्ठ्याने वॉशिंग मशिनमध्येच धुतल्या नोटा

एका व्यक्तिने नोटा सॅनिटाईज करण्यासाठी त्या चक्क मायक्रोव्हेवमध्येच गरम केल्या होत्या. नंतर त्याचा चांगलेच आर्थिक चटके बसले.

    सोल 4 ऑगस्ट: जगभर कोरोना व्हायरसचं थैमान (Coronavirus) अजुनही सुरूच आहे. या व्हायरसने सगळ्याचं दररोजचं जगणच बदलवून टाकलं आहे. त्याची धास्ती एवढी निर्माण झाली की लोक काय करतील याचा काही अंदाजच येत नाही. व्हायरस हा कुठेही असू शकतो त्यामुळे हाताचा स्पर्श होतील अशा सगळ्या वस्तू या सॅनिटाईज करून घेतल्या पाहिजेत असा सल्ला डॉक्टर वारंवार देत आहेत. याचा एवढा परिणाम दक्षिण कोरियातल्या (South korea) एका व्यक्तीवर झाल की त्याने आपल्याजवळ असलेल्या काही हजार नोटा चक्क वॉशिंग मशिनमध्येच टाकून धुतल्या. त्यामुळे त्याला त्या पैशांवर पाणी सोडावं लागलं.  kslnewsradioने याबाबतचं वृत्त दिलं आहे. राजधानी ‘सोल’जवळ  असलेल्या अनसॅन या शहरातली ही घटना आहे. इथे राहणाऱ्या एका गृहस्थांनी हे कृत्यू केलं. नंतर त्यांना आता पश्चाताप करावा लागतोय. नोटांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याने हा अघोरी प्रकार केला. आपल्या जवळच्या काही हजार नोटा त्यांनी वॉशिंग मशिनमध्ये चक्क धुण्यासाठी टाकल्या. त्याचा व्हायचा परिणाम तोच झाला. त्यातल्या बहुतांश नोटा या फाटल्या तर राहिलेल्या मोजक्या नोटांचा पार रंग उडाला. हा प्रकार करून हे महाशय थांबले नाहीत तर त्या सर्व नोटा घेऊन ते बँकेत गेलेत आणि त्या नोटा बदलून देण्याची मागणी केली. चिनच्या Gaming Industryला Appleचा धक्का, हटवले 30 हजार Apps झालेला प्रकार ऐकल्यानंतर त्या बँक अधिकाऱ्यानेही कपाळावर हात मारून घेतला. त्या नोटा एवढ्या खराब झाल्या होत्या की त्या बदलणे शक्यही नव्हतं. त्यामुळे त्या मोजण्याची तसदी सुद्धा बँकेने घेतली नाही. ‘अमेरिकेत 5 महिन्यात येणार COVID-19वर लस’, तज्ज्ञांच्या दाव्याने आशा वाढली अशीच घटना आणखी एक घटना दक्षिण कोरियातच घडली होती. एका व्यक्तिने नोटा सॅनिटाईज करण्यासाठी त्या चक्क मायक्रोव्हेवमध्येच गरम केल्या होत्या. त्या सर्व नोटा जळून गेल्याने त्याला मोठा फटका बसला. अशी प्रकरणं उघडकीस आल्याने शेवटी सरकारनेच आता नव्या मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यात असे प्रकार करू नका असं आवाहन आपल्या नागरिकांना केलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या