काहीही! कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याने गळ्याभोवती गुंडाळला अजगर

काहीही! कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याने गळ्याभोवती गुंडाळला अजगर

तऱ्हेतऱ्हेचे फेस मास्क ही तर सध्या फॅशन झाली आहे. पण हा अजब फेसमास्क कधी पाहिला नसेल. या अजगराच्या मास्कचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

लंडन, 18 सप्टेंबर : Coronavirus च्या साथीने सध्या जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याच महत्त्वाच्या गोष्टी असल्याचं जागतिक आरोग्य संघटना (WHO) पासून सगळ्यांनी सांगितलं आहे. प्रत्येकजण या आजारापासून वाचण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. तऱ्हेतऱ्हेचे फेस मास्क ही तर सध्या फॅशन झाली आहे. पण हा अजब फेसमास्क कधी पाहिला नसेल. इंग्लडमधील मँचेस्टर शहरातील एक 46 वर्षीय व्यक्ती कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अत्रंगी उपाय करत आहे.आपल्या गळ्याभोवती चक्क अजगर गुंडाळून तो फिरत असल्याचं दिसून आलं आहे. फेस मास्क म्हणूनही तो हे असलेच सरपटणारे प्राणी अंगावर वागवतो. तसे फोटो आता जगभरात व्हायरल झाले आहेत.

द इंडिपेंडंटने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की, सॅलफोर्ड येथून हा व्यक्ती स्विंटनला जाणाऱ्या बसमध्ये चढला होता. यावेळी बसमधील इतर प्रवाशांना त्याची कोरोनापासून बचाव करण्याची अनोखी पद्धत पाहून धक्का बसला. त्याने जिवंत अजगत मानेभोवती गुंडाळला होता. एका महिलेने याबाबत बोलताना सांगितलं की, सुरुवातीला त्याचा अजब मास्क थोडा मजेदार वाटला. पण तो खराखुरा साप आहे हे समजल्यावर भंबेरी उडली. अर्थात त्या अजगराने प्रवाशांना कोणताही त्रास दिला नसल्याचंही त्या प्रवासी महिलेने सांगितलं.

ब्रिटीश सरकारच्या मार्गदर्शनानुसार लोकांनी सर्जिकल मास्कच वापरण्याची आवश्यकता नाही. नागरिक त्यांनी स्वतः बनविलेले मास्क घालू शकतात. आता या अजगराचा वापर मास्क म्हणून करणं अतिरेक झाला, असं मँचेस्टर शहराच्या परिवहन विभागाच्या प्रवक्त्याने सांगितलं.

कोरोनापासून वाचण्यासाठी सापाचा मास्क म्हणून उपयोग करणं फायदेशीर असल्याचे अजून तरी कोणत्या अभ्यासातून समोर आलेलं नाही. तसंच सापाचा असा वापर केल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं ग्लुसेस्टरशायर  विद्यापीठाच्या प्राध्यापकाने एका वेबसाईटशी बोलताना म्हटलं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 18, 2020, 9:51 PM IST

ताज्या बातम्या