महिन्यात 4 वेळा लग्न अन् 3 वेळा घटस्फोट, सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला खटाटोप वाचून चक्रावून जाल

महिन्यात 4 वेळा लग्न अन् 3 वेळा घटस्फोट, सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला खटाटोप वाचून चक्रावून जाल

हा व्यक्ती एका बँकेत क्लर्कचं (Bank Clerk) काम करतो. जेव्हा त्यानं लग्नासाठी (Marriage) सुट्टी मागितली, तेव्हा त्याला केवळ आठ दिवसांची सुट्टी (Leave) मिळाली, यामुळे तो व्यक्ती प्रचंड नाराज झाला.

  • Share this:

नवी दिल्ली 16 एप्रिल : सुट्टीसाठी कर्मचारी (Employee) अनेकदा वेगवेगळी कारणं शोधताना दिसतात. मात्र, आता आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत, जी वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल. एका व्यक्तीनं सुट्टीसाठी 37 दिवसाच्या आत एकाच मुलीसोबत चार वेळा लग्नगाठ (Marriage) बांधली आणि तीन वेळा घटस्फोटही (Divorce) घेतला. ही घटना आहे तायवानमधील. या व्यक्तीनं हे सर्व केवळ यासाठी केलं, की त्याला पगारी सुट्ट्या मिळाव्या.

हा व्यक्ती ताइपेमधील एका बँकेत क्लर्कचं (Bank Clerk) काम करतो. जेव्हा त्यानं लग्नासाठी सुट्टी मागितली, तेव्हा त्याला केवळ आठ दिवसांची सुट्टी मिळाली, यामुळे तो व्यक्ती प्रचंड नाराज झाला. यानंतर अधिक सुट्टी मिळवण्यासाठी त्यानं जे काही केलं ते सर्वांनाच चक्रावून सोडणारं होतं.

6 एप्रिल 2020 रोजी या व्यक्तीचा विवाह झाला आणि काही दिवसांनंतर त्याच्या सुट्ट्या संपल्या, यानंतर त्यानं डोकं चालवत आपल्या सुट्ट्या वाढवून घेतल्या. यासाठी त्यानं ऑफिसमध्ये सांगितलं, की कशाप्रकारे त्याचा घटस्फोट आणि पुन्हा लग्नं झाली. विशेष म्हणजे हे कारण देताना ज्या घटस्फोटांचा आणि लग्नाचा त्यानं उल्लेख केला, ते एकाच मुलीसोबत होतं.

सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, 'त्या' 4.50 लाख कामगारांनाही मिळणार थेट मदत

आरोपीनं आपल्या पत्नीला घटस्फोट देत पुन्हा तिच्याचसोबत लग्न केलं. यानंतर त्यानं कायदा आणि नियमांचा हवाला देत पुन्हा सुट्टीची मागणी केली. त्यानं हे सलग चार वेळा केलं आणि तीन वेळा तलाक दिला. असं करत त्यानं चार लग्नांसाठी भरपूर सुट्ट्या घेतल्या. नंतर जेव्हा बँकेला त्याच्या या कथेवर संशय आला, तेव्हा सत्य समोर आलं. यानंतर बँकेनं पगारी सुट्ट्या देण्यास नकार दिला आणि प्रकरण न्यायालयात पोहोचलं.

आरोपीनं याविरोधात ताइपे सिटी लेबर ब्यूरोमध्ये तक्रार केली. या आधारे ब्यूरोनं बँकेला तब्बल 700 डॉलरचा दंड आकारला. बँकेनं या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीनं मागितलेल्या सुट्ट्या लेबर स्टॅनडर्ड अॅक्टअंतर्गत येत नाहीत. मात्र, ब्यूरोनं म्हटलं, की आरोपीनं सुट्ट्या घेण्यासाठी जे केलं ते चुकीचं आहे, मात्र या अॅक्टमध्ये असा उल्लेख कुठेही नाही, की सुट्टी घेण्यासाठी व्यक्ती एकाच व्यक्तीसोबत पुन्हा लग्न करू शकत नाही.

Published by: Kiran Pharate
First published: April 16, 2021, 8:26 AM IST

ताज्या बातम्या