मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! लेकीच्या खोलीत 2 विवस्त्र पुरुषांना पाहून भडकले वडील; रागात बंदूक काढली अन्...

Shocking! लेकीच्या खोलीत 2 विवस्त्र पुरुषांना पाहून भडकले वडील; रागात बंदूक काढली अन्...

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहून एका पित्याला राग अनावर झाला. त्याने दोघांवर गोळीबार सुरू केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 13 मार्च : आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहून एका पित्याला राग अनावर झाला. त्याने दोघांवर गोळीबार सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर खुनी हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडाचं आहे.

सूनेला घेऊन सासरा फरार, 1 महिना झाला तरी पत्ता नाही; मुलगा म्हणतो...

Nypost च्या रिपोर्टनुसार, 44 वर्षीय आरोपीचं नाव डेने व्हिक्टर मिलर आहे. त्याने आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहिलं होतं. त्यात एक व्यक्ती विवस्त्र अवस्थेत होती. हे पाहून तो संतप्त झाला आणि त्याने दोघांवर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन केला आणि मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

8 मार्च रोजी ज्या दोन व्यक्तींवर गोळीबार करण्यात आला ते मिलरचे रूममेट होते आणि ते दारूच्या नशेत होते, असं सांगण्यात आलं. मिलरने आपल्या मुलीच्या खोलीत दोन व्यक्तींवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांना दिली. अतिप्रमाणात दारू पिऊन ते चुकून मुलीच्या बेडरूममध्ये घुसले होते.

मिलरच्या मुलीने स्वतः तिच्या वडिलांना सावध केलं की कोणीतरी तिच्या खोलीत प्रवेश केला आहे. मात्र कोणाला काही समजण्यापूर्वीच मिलरने गोळीबार केला. गोळ्या झाडलेल्या दोघांपैकी एक म्हणाला- 'मिलर ओरडत होता की मी तुला मारीन.' त्याने अगदी जवळून तीन-चार राउंड फायर केले. सध्या, मिलर ली काउंटी शेरीफ कार्यालयाच्या ताब्यात आहे. त्याला 10 एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मिलरवर प्राणघातक हल्ला, प्राणघातक शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे.

First published:

Tags: Crime news, Shocking news