Home /News /videsh /

दुसऱ्याच्या अंत्यविधीला कब्रिस्तानमध्ये पाहिली स्वत:चीच कबर, समोर आलं धक्कादायक कारण

दुसऱ्याच्या अंत्यविधीला कब्रिस्तानमध्ये पाहिली स्वत:चीच कबर, समोर आलं धक्कादायक कारण

लान हॅटल अस्वस्थ झाले कारण अनेक महिन्यांपासून त्यांना कोणाचा फोन आला नव्हता. जेव्हा ते स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोर धक्कादायक कारण समोर आलं.

  स्कॉटलंड, 26 जानेवारी : आजच्या धावत्या आयुष्यात फोन एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते एकमेकांचे आरोग्य जाणून घेण्याचे एक साधन देखील आहे. जर एखाद्या व्यक्तीचा अनेक महिन्यांपासून फोन आला नाही तर त्याच्याविषयी काळजी वाटणं सहाजिक आहे. अशीच एक घटना स्कॉटलंडमध्ये एका वडिलांसोबत घडली आहे. अलान हॅटल अस्वस्थ झाले कारण अनेक महिन्यांपासून त्यांना कोणाचा फोन आला नव्हता. जेव्हा ते स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोर धक्कादायक कारण समोर आलं.
  स्वतःची कबर पाहून अलान हॅटल यांना बसला धक्का
  स्कॉटलंडच्या फोर्टफार्स इथे राहणाऱ्या 75 वर्षीय अॅलनला कब्रिस्तानमध्ये स्वतःची कबर सापडली. असं कधी होईल याचा त्यांनी विचारही केला नव्हता. यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांना व इतरांना फोन करुन सांगितले की, ते मृत नाही तर जिवंत आहे.
  ॅलन यांनी कबरवर स्वत: चे नाव असल्याच्या प्रकरणामध्ये अँगस कौन्सिलशी बोलणे केले आहे. ते हा दगड झाकण्याचा विचार करीत आहे. ते म्हणाले की, 'लोकांना वाटले की मी मेलो आहे. माझा फोन गेल्या 3-4 महिन्यांपासून बंद होता. यामुळे मी गोंधळून गेलो होतो, परंतु आता मला समजले आहे की, लोकांनी मला कॉल का केले नाही. त्यासोबतच अॅलन म्हणाले की त्यांच्या मृत्यूनंतर त्याला पुरण्याऐवजी अंत्यसंस्कार करण्याची इच्छा आहे.
  पहिल्या पत्नीवर केला आरोप
  या संपूर्ण घटनेमागील 75 वर्षीय अॅलन हॅटेल यांची पहिली पत्नी असल्याचा आरोप केला जात आहे. ज्यांना तिने 2 वर्षांपूर्वी घटस्फोट दिला होता. अॅलनचा असा दावा आहे की, त्यांच्या पहिल्या पत्नीने एक जमीन खरेदी केली आणि त्यावर दोघांची नावे लिहिलेली एक कबर दगड तयार केली. त्या दोघांना एकत्र पुरले जावे अशी तिची इच्छा होती.
  Published by:Renuka Dhaybar
  First published:

  पुढील बातम्या