ब्राझिलिया, 28 डिसेंबर: जमिनीपासून तब्बल 6000 फुटांवर (6000 ft high) दोन फुगे (Two Balloons) बांधून त्याच्यामध्ये एक दोरी (Rope) बांधण्यात आली. त्या दोरीवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाण्याचा विक्रम (World Record) एकाने रचला. आतापर्यंत एवढ्या उंचीवर अशा प्रकारचं साहस कुणीच केलं नव्हतं. अनेकांना उंचावरून खाली पाहिलं तरी चक्कर येते. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली वाकून पाहणंही अनेकजण भितीपोटी टाळत असतात. मात्र ब्राझीलमधील एका खेळाडूनं उंचीच्या सर्व मर्यादा ओलांडून नवा विक्रम रचला आहे.
असा रचला विक्रम
ब्राझीलमधील 34 वर्षांच्या रफेल जुगनू ब्रिडी यानं हा विक्रम रचला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार रफेलनं आकाशात सहा हजार फूट उंचीवर दोन हॉट एअर बलून बांधले. त्यांच्या दरम्यान एक दोरी बांधून त्यावरून तो चालत गेला. 6000 फूट उंची किती असते, याची कल्पना करायची असेल, तर बुर्ज खलिफाचा या जगातील सर्वात उंच इमारतीपेक्षा ही उंची दुप्पट आहे. यावरून त्याच्या धाडसाची कल्पना येऊ शकेल.
सुरक्षेची सर्व तयारी
हा प्रयोग करण्यापूर्वी रफेल आणि त्याच्या टीमनं सुरक्षेची सर्व तयारी केली होती. या अभियानात एकही चूक महागात पडणारी होती आणि जीवावर बेतणारी होती. हा प्रयोग म्हणजे जमिनीपासून शेकडो फूट उंच, ढगांच्याही वर हवेत चालण्याचाच प्रयोग होता. या प्रयोगासाठी त्याने अनेक वर्षं मेहनत घेतली होती आणि अथक परिश्रम केले होते. कमी उंचीपासून सुरूवात करून तो अधिकाधिक उंचीवर सराव करत होता. त्यासाठी त्याची पूर्ण टीम मेहनत घेत होती.
हे वाचा -
काय होते विचार?
हा विक्रम रचत असताना, दोरीवरून चालत असताना तुझ्या मनात काय विचार येत होते, असा सवाल काही पत्रकारांनी रफेलला विचारला. त्यावेळी आपल्या मनात काय येत होतं, ते आपल्या लक्षात नसल्याचं उत्तर त्यानं दिलं. 6131 फूट उंचीवरून चालण्याचा विश्वविक्रम आता रफेलच्या नावे नोंदवला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brazil, World record