Home /News /videsh /

सरकारी मदत हडपण्यासाठी केली हद्द, रचलं स्वतःच्याच मृत्यूचं नाटक

सरकारी मदत हडपण्यासाठी केली हद्द, रचलं स्वतःच्याच मृत्यूचं नाटक

कोरोना काळात विविध उद्योगधंद्यांना (Fraud in government scheme) मदत करण्याच्या सरकारी धोरणाचा गैरफायदा घेण्यासाठी एकाने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे.

    न्यूयॉर्क, 13 ऑक्टोबर : कोरोना काळात विविध उद्योगधंद्यांना (Fraud in government scheme) मदत करण्याच्या सरकारी धोरणाचा गैरफायदा घेण्यासाठी एकाने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे. सरकारी योजनेचा (Fraud in the scheme) फायदा लाटण्यासाठी आणि काहीही न करता श्रीमंत होण्याच्या लालसेतून त्यानं हे पाऊल उचललं. सुरुवातीला त्यात यश येत असल्याचा जाणवलं तरी शेवटी पोलिसांना त्याच्या चोरीचा शोध लागला आणि त्याला तुरुंगवासाची (Imprisonment for the crime) शिक्षा भोगण्यासाठी जावं लागलं. असा रचला बनाव अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये राहणाऱ्या डेव्हिड स्टेव्हली नावाच्या व्यक्तीनं कोरोनापूर्व काळात स्वतःला चार कंपन्यांचा को-फाउंडर असल्याची खोटी कागदपत्र सादर करत लाखोंचं कर्ज मिळवलं होतं. त्याच्या चोरीचा संशय जेव्हा कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनीला आला, तेव्हा डेव्हिडने आत्महत्या करण्याचं नाटक केलं आणि शहरातून फरार झाला. कोरोनाबाबतच्या योजनांचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी शिक्षा झालेला डेव्हिड हा पहिला अमेरिकन ठरला आहे. आत्महत्येचा बनाव कोरोना काळात बंद पडलेल्या व्यवसायांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारनं उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी काही योजना आखल्या होत्या. त्यामध्ये अनेक महिने बंद असणाऱ्या उद्योगांना पुन्हा चालना देण्यासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करण्याची योजना होती. या योजनेसाठी डेव्हिडनं चार बनावट दुकानांचे तपशील जमा करत मदतीसाठी दावा केला. मात्र हा दावा फोल असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी डेव्हिडचा शोध घ्यायला सुरुवात केली. डेव्हिडला पकडून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं. हे वाचा - ठरलं! विद्यार्थ्यांनो, 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेजेस होणार सुरु; जाणून घ्या नजरकैदेतून झाला फरार नजरकैदेतून फरार होण्यासाठी त्याने सुरुवातीला त्याच्यावर नजर ठेवाऱअया कॅमेऱ्याच्या वायर तोडल्या आणि घरातून निघून गेला. जाताना त्याने आपली कार सोबत घेतली आणि समुद्रकिनारी जाऊन पार्क केली. तिथून तो गायब झाला. समुद्रात जाऊन आत्महत्या केली, असं भासवण्याचा त्याचा डाव होता. मात्र डेव्हिडचा स्वभाव माहित असलेल्या अनेकांनी तो आत्महत्या करणं शक्यच नसल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला आणि अखेर त्याला कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं त्याला साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Financial fraud

    पुढील बातम्या