मराठी बातम्या /बातम्या /विदेश /वाढदिवसाच्या आनंदात घेतली जोरदार तान, फुफ्फूस फाटून झाली जखम

वाढदिवसाच्या आनंदात घेतली जोरदार तान, फुफ्फूस फाटून झाली जखम

मित्राच्या बर्थडे सेलिब्रेशनला क्षमतेपेक्षा अधिक मोठ्याने गाणं गायचा प्रयत्न (Man faced lung injury after singing his heart in birthday party) केल्यामुळे एकाचं फुफ्फूस फाटून त्याला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे.

बिजिंग, 1 डिसेंबर: मित्राच्या बर्थडे सेलिब्रेशनला क्षमतेपेक्षा अधिक मोठ्याने गाणं गायचा प्रयत्न (Man faced lung injury after singing his heart in birthday party) केल्यामुळे एकाचं फुफ्फूस फाटून त्याला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे. मित्राच्या वाढदिवशी कराओकेवर (Effect of loud singing of health) गाणं गाऊन सर्वांना प्रभावित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची कल्पनाही आली नव्हती. उत्साहात त्याने माईक हातात घेऊन वरच्या पट्टीत गाणं गाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा (Big price of singing) भलामोठा भुर्दंड त्याला सोसावा लागल्याची घटना समोर आली आहे.

अशी घडली घटना

चीनमधील हुनान प्रांतात ही घटना घडली आहे. या भागात राहणारा 25 वर्षांचा वांगे जे नावाचा तरुण त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत त्याने कराओकेवर गाणं गाण्याचा निर्णय घेतला. New Drunken Concubine नावाच्या गाण्यावर त्याने ठेका धरला आणि गायला सुरुवात केली. लोकांना त्याचं गाणं सहन झालं, मात्र त्याच्या स्वतःच्या फुफ्फूसाला काही ते सहन झालं नाही.

हॉस्पिटलमध्ये दाखल

घटनेच्या दिवशी त्याच्या छातीत दुखत होतं. मात्र कळा सहन करत त्याने घरीच रात्र घालवली. दुसऱ्या दिवशीही वेदना कमी न झाल्यामुळे त्याने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एक्स-रे आणि इतर तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्याची त्वचा आणि फुफ्फुसं यांच्यामध्ये काही बबल्स तयार झाल्याचं त्यांना दिसलं. हा बबल एक सेंटीमीटरपेक्षाही मोठा असल्याचं दिसून आलं. या फुग्यामुळेच तरुणाचं फुफ्फूस सुजलं असून त्याला वेदना होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हे वाचा- कोणताही गुन्हा न करता तब्बल 4 दशकं तुरुंगात राहिला; 43 वर्षांनी निर्दोष सुटका

उपचारानंतर दिलासा

डॉक्टरांनी सर्जरी करून हे बबल्स काढून टाकले असून काही दिवसांतच तरुणाला बरं वाटू लागले, असं म्हटलं आहे. मित्राच्या बर्थडेच्या गाणं गाण्याच्या निमित्तानं हा आजार लवकर त्याच्या लक्षात आला आणि उपचार केल्यानंतर आता तरुण बरा होत आहे.

First published:
top videos

    Tags: China, Health, Shocking news