दारुच्या नादात कोरोना रुग्णाने केला हा प्रताप, CCTV पाहून पोलिसांनाही बसला धक्का

दारुच्या नादात कोरोना रुग्णाने केला हा प्रताप, CCTV पाहून पोलिसांनाही बसला धक्का

एक रुग्ण हॉटेलमधल्या रुममध्ये दिसत नाही हे लक्षात आल्यावर सगळीकडेच खळबळ उडाली.

  • Share this:

हॅमिल्टन 11 जुलै: जगभर कोरोना व्हायरसचं सुरू असलेलं थैमान अजुही कायम आहे. जगातल्या 190पेक्षा जास्त देशांमध्ये ही साथ वेगाने पसरत आहे. त्यामुळे रुग्णांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी आणि उपचारासाठी सगळ्याच सरकारांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. न्यूझिलँडमध्ये तर एका क्वारंटाइन सेंटरमध्ये दारुच्या नादात एका रुग्णाने चक्क कंपाउंडची तार तोडून पलायन केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली असून लोक पळून जाऊ नयेत म्हणून आता खास काळजी घेतली जात आहे.

हॅमिल्टन इथल्या एका हॉटेलमध्ये सरकारने क्वारंटाइन सेंटर तयार केलं. शहरात आलेल्या सर्व नागरीकांना काही दिवस इथे राहावं लागते आणि त्यांची टेस्ट जर निगेटिव्ह आली तर त्यांना सुट्ट दिली जाते.

हा नागरीक सिडनीवरून आला होता. नियमाप्रमाणे त्याला क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्याला काही लक्षणेही दिसत होती. मात्र दररोज दारु पिण्याची सवय असल्याने तो बेचैन होत होता. दोन दिवस गेल्यानंतर तो हॉटेलमध्ये अस्वस्थ झाला. स्थानिक डॉक्टरांनी मात्र त्याचं वय आणि इतर गोष्टी पाहून दारू देण्यास नकार दिला.

चीनचं स्वप्न झालं उद्ध्वस्त; अंतराळात पाठवलेलं सॅटेलाइट झालं फेल

त्यामुळे त्या माणसाचे सगळ्यांच्या नजरा चुकवून कंपाउंडची 6 फुटांची तार कापली आणि सेंटरमधून पलायन केलं. एक रुग्ण हॉटेलमधल्या रुममध्ये दिसत नाही हे लक्षात आल्यावर सगळीकडेच खळबळ उडाली. शेवटी पोलिसांनी हॉटेलमधल्या CCTV फुटेजचा तपास केला तेव्हा त्यांना धक्काच बसला.

ज्यू आणि मुस्लिमांमध्ये कोरोनाचा प्रसार करा; राजकीय पक्षाचं खळबळजनक वक्तव्य

हा माणूस सुरक्षेसाठी असलेल्या कंपाउंडची तार तोडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ती तार तोडून तो पसार झाला होता. नंतर तासाभरात पोलिसांनी या रुग्णाला ताब्यात घेतलं.

आता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या आधीही देशातल्या काही सेंटरमध्ये रुग्णांनी पलायन केल्याच्या घटना घडल्याने प्रशासन हादरून गेलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 11, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या