Home /News /videsh /

विचित्र प्रकरण! महिलेनं निर्वासित युक्रेनियन तरुणीला दिला घरात आसरा ; तिनेच पळवला पती

विचित्र प्रकरण! महिलेनं निर्वासित युक्रेनियन तरुणीला दिला घरात आसरा ; तिनेच पळवला पती

मे महिन्यात टोनी गार्नेट नावाच्या महिलेने सोफिया कारकादिम नावाच्या तरुणीला तिच्या घरात राहू दिलं होतं. यानंतर तिचा पती आणि तरुणी यांच्यातील जवळीकता वाढली.

    कीव 23 मे : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक लोक तिथून इतर देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी जात आहेत. याच क्रमात युक्रेनमधील 22 वर्षीय तरुणी ब्रिटनमध्ये पळून गेली. जिथे एका महिलेने दया दाखवून तिला आपल्या घरात आसरा दिला. मुलीला आसरा देऊन महिलेने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. महिलेनं ज्या युक्रेनियन तरुणीला आसरा दिला ती महिलेच्याच पतीच्या प्रेमात पडली आणि त्याला सोबत घेऊन घरातून फरार झाली (Man Dumps Wife and Ran Away With Ukrainian Girl). क्षणार्धात राख करणारं रशियाचं लेझर शस्त्र काय आहे? युक्रेनच्या अध्यक्षांनी का उडवली खिल्ली? 'द सन' वेबसाइटशी बोलताना पीडितेने सांगितलं की, युद्धग्रस्त युक्रेनमधून पळून आलेल्या 22 वर्षीय सोफिया कारकादिमला तिने तिच्या घरात आश्रय दिला होता, परंतु या तरुणीने तिचा पतीच तिच्यापासून हिरावून घेतला. मे महिन्यात टोनी गार्नेट नावाच्या महिलेने सोफिया कारकादिम नावाच्या तरुणीला तिच्या घरात राहू दिलं होतं. यानंतर तिचा पती आणि तरुणी यांच्यातील जवळीकता वाढली. महिलेनं सांगितलं की, या तरुणीची नजर आधीपासूनच महिलेच्या पतीवर होती. महिलेनं सांगितलं की, या तरुणीने फेसबुक पेजवर महिलेशी संपर्क साधला होता. त्यानंतर तिने या तरुणीची दया करून तिला आसरा देण्याचा निर्णय घेतला. महिलेनं सांगितलं की तिच्या नवऱ्याला स्लोव्हाकियन भाषा कळते आणि तरुणी युक्रेनियन भाषा बोलते. दोन्ही भाषा जवळपास सारख्याच आहेत, त्यामुळे दोघे काय बोलतात ते तिला समजत नसे. हळूहळू दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि तिचा पती नंतर या तरुणीसोबत पळून गेला. Russia-Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना त्यांचा टी-शर्ट का विकावा लागला?, 'इतकी' मिळाली किंमत दुसरीकडे, आरोपी तरुणीनं सांगितलं की, पाहताच क्षणी ती टोनीच्या प्रेमात पडली होती. आपण जाणूनबुजून असं काही केलं नसल्याचं तिने सांगितलं. जे घडलं त्याबद्दल तिला खूप वाईट वाटतं, पण आता तिला काहीच करता येत नाहीये. तर महिलेच्या पतीचं म्हणणं आहे की आता तो 22 वर्षीय सोफियाच्या प्रेमात पडला आहे. त्याला आता उरलेलं आयुष्य तिच्यासोबत घालवायचं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Russia Ukraine

    पुढील बातम्या