मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

...अन् पत्नीने कॅमेऱ्यात कैद केला पतीचा मृत्यू; बर्फाळ नदीत स्टंट करणं बेतलं जीवावर

...अन् पत्नीने कॅमेऱ्यात कैद केला पतीचा मृत्यू; बर्फाळ नदीत स्टंट करणं बेतलं जीवावर

कॅमेऱ्यासमोर, 38 वर्षीय अलेक्झांडर युक्रेनमधील बर्फाळ नदी चोरटोमलिकमध्ये उडी मारण्याच्या तयारीत होता. तो पत्नीसह तिथे गेला

कॅमेऱ्यासमोर, 38 वर्षीय अलेक्झांडर युक्रेनमधील बर्फाळ नदी चोरटोमलिकमध्ये उडी मारण्याच्या तयारीत होता. तो पत्नीसह तिथे गेला

कॅमेऱ्यासमोर, 38 वर्षीय अलेक्झांडर युक्रेनमधील बर्फाळ नदी चोरटोमलिकमध्ये उडी मारण्याच्या तयारीत होता. तो पत्नीसह तिथे गेला

  नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : साहस करून काहीतरी वेगळं करण्याचा अनेकांना छंद आणि आवडही असते. पण कधी कधी असे छंद भलतेच महागात पडतात. अशाच एका घटनेत एका व्यक्तीचा असा मृत्यू झाला (Man Died During Stunt), ज्याबद्दल ऐकून सगळेच हादरले. या व्यक्तीला 'खतरों का खिलाड़ी' व्हायचं होतं. त्याला आपलं धैर्य़ आणि साहस जगाला दाखवायचं होतं. मात्र त्याची कथा किती लोकांपर्यंत पोहोचली, हे पाहायला आज तोच या जगात नाही. कॅमेऱ्यासमोर, 38 वर्षीय अलेक्झांडर युक्रेनमधील बर्फाळ नदी चोरटोमलिकमध्ये उडी मारण्याच्या तयारीत होता. तो पत्नीसह तिथे गेला. त्याने बर्फाच्छादित नदीत उडी मारण्याचा थरारक पराक्रम केल्याचं जगाने पाहावं अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा हा स्टंट पत्नीशिवाय इतर कोणीही बघू शकलं नाही.

  'मृत्यूनंतर आत्माही जिवंत राहत नाही कारण...', तज्ज्ञाचा खळबळजनक दावा

  अलेक्झांडर आपली पत्नी आणि एका मित्रासह चोरटोमलिक नदीत उडी मारण्यासाठी आला होता. त्याने बायकोच्या हातात कॅमेरा दिला आणि मित्र त्याला उडी मारण्यासाठी बर्फात छिद्र पाडायला लागला. संपूर्ण नदीवर बर्फाची जाड चादर गोठली होती. तिथलं तापमान उणे ५ अंश होतं आणि त्यात तो उडी मारायला गेला होता. पाण्यात उडी मारण्यापूर्वी त्याच्या पत्नीने त्याला अनेकवेळा विचारलं होतं की तो या साहसासाठी पूर्णपणे तयार आहे का? त्याला भीती तर वाटत नाही ना? मात्र आपण यासाठी तयार असल्याचं त्याने म्हटलं. या बर्फाळ पाण्यामुळे त्याची प्रकृती बिघडण्याची भीती पत्नीने व्यक्त केली, मात्र तरीही तो आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यानंतर त्याने नदीवरील छिद्रात उडी मारली. काही सेकंदातच तो नजरेआड झाला (Man Trapped under the Ice). कॅमेरा घेऊन उभी असलेली बायको ओरडतच राहिली. आजूबाजूच्या लोकांना मदतीची विनंती केली. बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं, मात्र त्याला कोणीही शोधू शकलं नाही. तो बर्फाळ नदीच्या खोलीत बुडाला होता. खूप प्रयत्नांनंतर दुसऱ्या दिवशी अलेक्झांडरचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.

  बाप-मुलगा रात्री पित होते दारू; दुसऱ्या दिवशी रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृत

  40 वर्षीय रशियन वकील अॅना उसकोवा हिनेही बर्फाळ नदीत उडी मारली तेव्हा असंच काहीसं घडलं. तिची मुलं आणि पतीही तिथे उपस्थित होता. पुढच्याच क्षणी ती दिसायची बंद झाली, म्हणून मुलं ओरडू लागली. तिचा पती ताबडतोब नदीच्या आत गेला आणि तिला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking news, Stunt video

  पुढील बातम्या