मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

एकाच वेळी तब्बल 35 महिलांना डेट करणाऱ्या 'मजनू'ला अटक, गिफ्ट्ससाठी सांगायचा वेगवेगळा वाढदिवस

एकाच वेळी तब्बल 35 महिलांना डेट करणाऱ्या 'मजनू'ला अटक, गिफ्ट्ससाठी सांगायचा वेगवेगळा वाढदिवस

आरोपी घरोघरी प्रोडक्ट्स विकताना अशा महिलांना निशाणा करायचा, ज्या घरात एकट्याच राहतात. तो महिलांना चांगल्या रिलेशनशिपसह, त्यांच्याशी लग्न करण्याचं आमिष दाखवून गिफ्ट्स आणि पैसे उकळायचा.

  • Published by:  Karishma

टोकियो, 24 एप्रिल : प्रेमप्रकरणात आतापर्यंत अनेकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र एकाच वेळी वेगवेगळ्या तब्बल 35 महिलांना डेट करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 35 महिलांना डेट करणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. एकाच वेळी इतक्या महिलांना आरोपी केवळ डेड करायचा नाही, तर त्याने सर्व महिलांकडून गिफ्ट्स, व्हाउचर, पैसे उकळण्यासाठी आपल्या वाढदिवसाची तारीखही वेगवेगळी सांगितली. महत्त्वाची बाब म्हणजे या व्यक्तीचं राहण्याचं कोणतंही निश्चित ठिकाण नव्हतं. पोलिसांनी या व्यक्तीवर फसववणुकीचा खटला दाखल करत, त्याला अटक केली आहे.

35 हून अधिक महिलांची फसवणूक -

जपानमधील या पार्ट टाईम काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव ताकाशी मियागावा असं आहे. आपल्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी सांगितलं, की या आरोपीने डेट करणाऱ्या सर्व महिलांना त्याच्या वाढदिवसाची तारीख वेगवेगळी सांगितली होती. सर्व महिलांसोबत त्याने रिलेशनशिपमध्ये अतिशय गंभीर असल्याचं नाटक केलं होतं. याच आधारे त्याच्यावर 35 महिलांच्या फसवणुकीचा आरोप लावण्यात आला आहे.

आरोपीचा खरा वाढदिवस 13 नोव्हेंबर रोजी असतो. परंतु त्याने एका 47 वर्षीय महिलेला वाढदिवस 22 फेब्रुवारी सांगितला. दुसऱ्या 40 वर्षीय महिलेला जुलै, आणखी 35 वर्षीय महिलेला एप्रिलमध्ये जन्मदिवस असल्याचं सांगितलं. या व्यक्तीकडून फसवणूक झालेल्या महिलांची संख्या 35 हून अधिक असल्याचा दावा एका मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

(वाचा - आई-वडिलांच्या घटस्फोट प्रकरणात मुलाला 10 कोटी डॉलरचा दंड! काय आहे अजब प्रकरण?)

70 हजारांचं गिफ्ट घेतल्याचा आरोप -

SoraNews24 च्या रिपोर्टनुसार, या महिलांनी आरोपी मियागावावर 70 हजारपर्यंतचे गिफ्ट्स घेतल्याचा आरोप केला आहे. यात कपडे, कॅशचाही समावेश आहे. आरोपी या सर्व महिलांना हायड्रोजन वॉटर शॉवर हेड आणि इतर उत्पादनांची विक्री करणाऱ्या एका मार्केटिंग कंपनीसाठी काम करताना भेटला होता.

एकट्या महिलेला करायचा निशाणा -

आरोपी घरोघरी प्रोडक्ट्स विकताना अशा महिलांना निशाणा करायचा, ज्या घरात एकट्याच राहतात. तो महिलांना चांगल्या रिलेशनशिपसह, त्यांच्याशी लग्न करण्याचं आमिष दाखवून गिफ्ट्स आणि पैसे उकळायचा. ज्यावेळी महिलांना त्याच्या या संपूर्ण फसवणुकीबाबत माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी एकत्र येत स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत, मियागावाला अटक केली आहे.

First published:

Tags: Japan