माझ्या मुलीचा खरा बाप तूच आहेस हे भावाला सांग, मरताना वहिनीने दिला धक्का

माझ्या मुलीचा खरा बाप तूच आहेस हे भावाला सांग, मरताना वहिनीने दिला धक्का

दीर आणि वहिणीमध्ये सुरू असलेलं हे प्रेम प्रकरण फार दिवस टिकलं नाही. ते दोघे परस्पर संमतीने वेगळे झाले. पण याबद्दल भावाला काहीच सांगायचं नाही असं त्यांनी ठरवलं.

  • Share this:

वॉशिंगटन, 29 नोव्हेंबर : सोशल नेटवर्किंग साइट रेडिटवर एका व्यक्तीने धक्कादायक प्रकरण उघडकीस आणून लोकांकडूनच सल्ला मागितला आहे. एका अमेरिकन व्यक्तीने सांगितले की, भावाची पत्नी एप्रिलसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. हे प्रकरण लग्नानंतर सुरू झाले. दोघांमध्यें शारीरिक संबंधही होते. त्यातून एप्रिल गर्भवती झाली पण याची कानोकान भावाला काहीच माहिती नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दीर आणि वहिणीमध्ये सुरू असलेलं हे प्रेम प्रकरण फार दिवस टिकलं नाही. ते दोघे परस्पर संमतीने वेगळे झाले. पण याबद्दल भावाला काहीच सांगायचं नाही असं त्यांनी ठरवलं. जर याची माहिती भावाला कळली तर तो स्वत:ला गमावून बसेन आणि होत्याचं नव्हतं होईल. त्यामुळे हे कोणालाच सांगायचं नाही असं एप्रिल आणि तिच्या दिराने ठरवलं.

काही दिवसांनंतर एप्रिलने लेसी नावाच्या गोड मुलीला जन्म दिला. लेसी जसजशी मोठी होत गेली तसतशी ती दिरासारखी दिसू लागली. त्यामुळे दिरात आणि एप्रिलमध्ये झालेल्या शारीरिक संबंधातून लेसी झाली असल्यांचं दोघांच्या लक्षात आलं. पण तरीही हे भावाला कळू न देण्याचं त्यांनी ठरवलं.

इतर बातम्या - मुंबईत घरातच मुली असुरक्षित, 90 टक्के बलात्काराच्या घटना ओळखीच्या व्यक्तीकडूनच..

काही दिवसांनंतर एप्रिलला कर्करोग झाला. पत्नीच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर विल पूर्णपणे तुटला होता. तो एकटा पडला होता. आजारपणाच्या या काळात लेसी आणि विलला सगळं सत्य कळलं पाहिजे असं एप्रिलला वाटू लागलं. त्यानंतर तिने दिराकडून तो सगळं सत्य समोर आणेल असं वचन घेतलं.

यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना व्यक्ती (दीराने)ने लिहलं की, 'मागच्या महिन्यात एप्रिलचा मृत्यू झाला. पण मी अजूनही लेसी आणि विलला खरं काहीच सांगू शकलो नाही. एप्रिलच्या जाण्यानंतर विलला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला सत्य सांगण्याची माझ्यात हिम्मत नाही आहे.'

इतर बातम्या - देवा! खात्यातून काढत होता कोणा दुसऱ्याचे पैसे, म्हणाला- मला वाटलं मोदींनी टाकले

विल हा लेसीला त्याचीच मुलगी समजतो. तो तिला खूप जीव लावतो. एप्रिलच्या जाण्यानंतर लेसीच विलचा सहारा आहे. अशात जर त्याला सत्य समजलं की लेसी त्याची मुलगी नाही तर हा धक्का त्याला सहन होणार नाही. असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. हीच बाब सोशल मीडियावर शेअर करत तर लोकांचा सल्ला मागत आहे की, त्याने सगळं सांगावं की नाही. कारण नाही सांगितलं तर एप्रिलची शेवटची इच्छा अपूर्ण राहिल.

ही पोस्ट वाचल्यानंतर, लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत आणि सल्ला देत आहेत. बर्‍याच लोकांनी म्हटले आहे की, एप्रिल आता या जगात नाही, म्हणून विलला या सर्व गोष्टींबद्दल सांगणं योग्य नाही. तर काहींनी असेही म्हटले की, जिवंत असताना एप्रिलने कधीही या सर्व गोष्टी विलला सांगण्याची हिम्मत केली नाही. जर तिला खरोखर हे हवं असतं तर ती हे आपल्या पतीला सांगू शकली असती, परंतु तिने हे सर्व केले नाही आणि मरताना तिने या गोष्टीचं ओझं तुमच्यावर ठेवलं. यात एका व्यक्तीने असे म्हटले की, या परिस्थितीत दोन लोकांना अशा भूतकाळाबद्दल सांगणे म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक दुखवण्यासारखे आहे.

इतर बातम्या - 'रड्या ऑफ द ईयर अवार्ड संज्यालाच दिला पाहिजे'

First published: November 21, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading