मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

व्यक्तीनं धारदार चाकूने कापलं स्वतःचं गुप्तांग अन्...; समोर आलं धक्कादायक कारण

व्यक्तीनं धारदार चाकूने कापलं स्वतःचं गुप्तांग अन्...; समोर आलं धक्कादायक कारण

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, की घटनेनंतर तब्बल १६ तासांनी रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आलं. पीडिताचे कुटुंबीय त्याचं कापलं गेलेलं गुप्तांगही सोबत घेऊन आले होते

  • Published by:  Kiran Pharate
केनिया 09 ऑक्टोबर : मानसिक रुग्ण असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीनं (Schizophrenic Kenyan Man) किचनमधील चाकूने आपलं गुप्तांग कापल्याची घटना नुकतीच समोर आली आहे (Man Chopped off his Private Part with Knife) . मिळालेल्या माहितीनुसार, त्यानं मागील अनेक दिवसांपासून औषधं घेणं सोडलं होतं. ही घटना केनयामधील आहे. लग्नाला येणाऱ्या समस्यांमुळे (Marriage Problems) त्यानं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस ठाण्यातही महिला असुरक्षित; पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..., कुटुंबीयांना या घटनेची माहिती तब्बल 16 तासांनी मिळाली. यानंतर लगेचच या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशा प्रकरणांमध्ये जेव्हा व्यक्ती आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःचं गुप्तांग कापण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला फालसीसाईड म्हणून ओळखलं जातं. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, की घटनेनंतर तब्बल १६ तासांनी रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आलं. पीडिताचे कुटुंबीय त्याचं कापलं गेलेलं गुप्तांगही सोबत घेऊन आले होते. डॉक्टरांनी सांगितलं की हा व्यक्ती आपल्या पार्टनरसोबतच लैंगिक समस्यांमुळे त्रस्त होता. यानंतर या व्यक्तीनं स्वतःच गुप्तांग कापण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीची प्रकरणं अतिशय कमी असतात. अशा पद्धतीचं काम करणारे व्यक्ती मानसिकरित्या अस्थिर किंवा ड्रग्जच्या आहारी गेलेले असतात. गूढ कायम! झाडावर लटकत होता बेपत्ता तरुणाचा मृतदेह, किरकोळ भांडणानंतर होता तणावात ही संपूर्ण घटना एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केली गेली आहे. यात पीडित व्यक्तीचं नाव आणि त्याचा पत्ता अशी कोणतीही माहिती दिली गेली नाही. रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं, की सुरुवातीला डॉक्टरांनी त्याचं हे कापलेलं लिंग पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लिंग कापून बराच वेळ झाला असल्यानं आणि ते व्यवस्थित ठेवलेलं नसल्यानं त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. डॉक्टरांनी कोणतंही इन्फेक्शन टाळण्यासाठी त्याचा अवयव स्वच्छ केला आणि रक्तस्त्राव थांबवला.
First published:

Tags: Mental health, PRIVATE part

पुढील बातम्या