Mali Airstrike : फ्रान्सचा अल कायदाला मोठा झटका! मालीमध्ये हल्ला करत 50 दहशतवादी मारले

Mali Airstrike : फ्रान्सचा अल कायदाला मोठा झटका! मालीमध्ये हल्ला करत 50 दहशतवादी मारले

France Air Strike मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यावर इस्लाम विरोधी अशी टीका होत असतानाच आता फ्रेंच संरक्षण दलाकडून मोठ्या कारवाईची बातमी आली आहे.

  • Share this:

पॅरिस, 3 नोव्हेंबर : फ्रान्समध्ये (France) गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांनी जगभरात खळबळ उडाली असतानाच आता या देशाने मोठं पाऊल उचलत मालीमध्ये (Mali) थेट Airstrike केला आणि या हवाई हल्ल्यात 50 दहशतवादी (Jihadi) मारले गेल्याचं वृत्त आहे. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेत बुर्किना फासो आणि नायजेरियाच्या सीमेजवळच्या हा हवाई हल्ला ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आला. 30 ऑक्टोबरलाच ही कारवाई झाली असून त्याची माहिती मात्र फ्रेंच मंत्र्यांनी सोमवारी उशिरा जाहीर केली. हे दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. ते अल कायदासाठी (Al Qaeda) काम करत असल्याचं फ्रेंच सरकारकडून सांगण्यात आलं.

फ्रेंच सैन्याने थेट आफ्रिकेत घुसून ही कारवाई केले. 30 ऑक्टोबरला सेंट्रल माली इथे अतिरेक्यांच्या एका तळावर हल्ला करण्यात आला. इथे अल कायदाचे दहशतवादी घुसखोरी करत होते. त्यांना रोखण्यासाठी फ्रेंच लष्कराने ड्रोनच्या राहाय्याने कारवाई करत 50 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जिहादींकडून शस्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे, असं फ्रेंच संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी सांगितलं. मालीच्या हंगामी सरकारच्या सदस्यांशी बातचीत केल्यानंतर त्यांनी शुक्रवारच्या या कारवाईची माहिती जाहीर केली.

जिहादींविरोधातल्या या फ्रेंच कारवाईला बार्खानी असं म्हणत त्यांनी याची माहिती दिली. पश्चिम आफ्रिकेत बर्किनो फासो, निगर आणि नायजेरिया यांच्या सीमेलगत जिहादी दहशतवाद्यांच्या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी सरकारी लष्कर तैनात होतं. त्यांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

दहशतवादी तळांवरून मोटारसायकली, शस्त्रास्त्र मिळाली असल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांना अल कायदाकडून धमक्या आल्याचं वृत्तही फ्रेंच माध्यमांनी दिलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 3, 2020, 5:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या