माले,ता.19 एप्रिल: उन्हाळ्याच्या सुटीत बाहेर फिरायला जाण्याचा तुमचा विचार असले आणि तुमच्याकडे बक्कळ पैसा असेल तर समुद्रात अलिशान बंगल्यात राहण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला एका दिवसाला फक्त 33 लाख भाडं द्यावं लागेल.
मालदिवच्या निळ्याशार आणि स्वच्छ समुद्रात काही बड्या हॉटेल समुहांनी समुद्राच्या खोल पाण्यात असे बंगले बांधले आहेत. कॉनरेड मॉलदीव्हज् रंगाली बेटं, रेस्टॉरंट आणि अनंनतरा किहावाह व्हिलाज हे अशा बंगल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
पाण्याखाली 17 फुट खोल असे बंगले तयार होत आहेत.
पाण्याच्यावर एक मजला तर खाली एक मजला अशी त्याची रचना राहणार असून स्टिल,काँक्रिट आणि अॅक्रिलिकचा वापर करून याचं बांधकाम होणार आहे. बेडरूम, डायनिंगहॉल, किचन आणि लिंव्हिंगरूम अशी या बंगल्याची रचना आहे. स्वच्छ काचेच्या बाहेरून दिसणारे विविधरंगी मासे आणि समुद्र वनस्पती यांचं नयनरम्य दृष्य त्यातून दिसणार आहे.
इथे आलेल्या पाहुण्यांच्या दिमतीला नोकर चाकरही असणार असून सी प्लेनने पाहुणे थेट समुद्रात आणि स्पेशल मोटर बोटने त्यांना या खास हॉटेलवर आणण्यात येणार आहे.
c
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Luxury, Maldives, Tourist, Underwater