S M L

मालदीवमध्ये कोर्ट विरुद्ध सरकार संघर्ष पेटला, आणीबाणी लागू !

राष्ट्रपती अब्दुला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश मान्य करण्यास नकार दिलाय. त्यामुळे मालदीवमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2018 10:36 PM IST

मालदीवमध्ये कोर्ट विरुद्ध सरकार संघर्ष पेटला, आणीबाणी लागू !

05 फेब्रुवारी : मालदीवमध्ये राजकीय भूकंप आलाय. राष्ट्रपती अब्दुला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश मान्य करण्यास नकार दिलाय. त्यामुळे मालदीवमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. कायदेमंत्री अजीमा शुकुर यांनी आणीबाणीची घोषणा केलीये.

सरकारने 15 दिवसांसाठी आणीबाणीची घोषणा केलीये. या आदेशानंतर सैन्याला कोणत्याही संशयिताला अटक करण्याची परवानगी देण्यात आलीये. सरकारने आधीच संसदेत  शरणागती पत्कारली आहे. राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्यावर महाभियोग आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला थांबवण्यासाठी सैन्याला आदेश दिले आहे.

सुप्रीम कोर्टाने माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्याविरोधात सुनावणीला असंवैधानिक असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच विरोधीपक्षाच्या नऊ खासदारांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळेच सरकार आणि सुप्रीम कोर्टामध्ये संघर्ष सुरू झालाय.

कोर्ट विरुद्ध सरकार

राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांनी कोर्टाला लिहिलेल्या एका पत्रामध्ये म्हटलं होतं की, सुप्रीम कोर्टाचे आदेश सरकारच्या ताकदीवर अतिक्रमण आहे आणि हे राष्ट्रीय सुरक्षा, जनहिताचं उल्लंघन आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाला आपल्या आदेशावर फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता.

भारताच्या नागरिकांना सुचना

मालदीवमध्ये आणीबाणी लागू झाल्यामुळे भारताने आपल्या नागरिकांना मालदीवमध्ये न जाण्याची सुचना केलीये.

याआधी कायदेमंत्री अजीमा शकूर यांनी स्पष्ट केलंय की, सरकार हे मान्य करत नाही की राजकीय बंदी असलेल्यांची सुटका करण्याचा कोर्टाचा आदेशाची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे कोर्टाने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दोषी ठरवण्यात आलं हा निर्णय़ राजकीय दृष्ट्या प्रेरीत आहे असे आदेश कोर्टाने दिले होते.

कोर्टाच्या आदेशाचं पालन करा, संयुक्त राष्ट्रांचा मालदीवला सल्ला

कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षाच्या समर्थकांनी जोरदार निदर्शनं सुरू केलीये आणि सरकारने आदेशाचं पालन करावं अशी मागणी केलीये. मागील आठवड्यात विरोधक समर्थक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेनं मालदीव सरकारला कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याचा सल्ला दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 10:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close