Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मलेशियात एशियन नाचोज या नावानं मिळतो पापड; किंमत वाचून मागवण्याची नाही होणार हिंमत

मलेशियात एशियन नाचोज या नावानं मिळतो पापड; किंमत वाचून मागवण्याची नाही होणार हिंमत

मलेशियात एशियन नाचोज या नावानं मिळतो पापड

मलेशियात एशियन नाचोज या नावानं मिळतो पापड

अलीकडे भारतीय खाद्यसंस्कृतीतल्या अनेक पदार्थांची नावं पाश्चिमात्त्य नावांनी सजू लागली आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

क्वालालंपुर, 23 जानेवारी : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये इतकं वैविध्य आहे, की जगभरात अनेक भारतीय पदार्थांना खूप मागणी असते. जगात कुठे ना कुठे अशा भारतीय पदार्थांशी साम्य असणारे पदार्थ बनवले जातात. बऱ्याचदा ते आहे त्याच भारतीय नावाने विकले जातात; मात्र काही वेळा त्यांना वेगळं नाव दिलं जातं. अशाच एका पदार्थावरून एका ट्विटर युझरने तीव्र शब्दांत टीका केलीय. मलेशियातल्या एका रेस्टॉरंटमध्ये एशियन नाचोज म्हणून चक्क पापड विकले जात आहेत. त्याचा फोटो ट्विटरवर शेअर करून युझरने संताप व्यक्त केलाय.

भारतीय चहासारखं पाश्चिमात्त्य देशांमध्ये ‘चाय टी’ नावाचं पेय मिळतं. दाक्षिणात्य डोसा क्रेप म्हणून आवडीनं खाल्ला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेले पापड आता मलेशियात एशियन नाचोज म्हणून विकले जात आहेत.

समंथा नावाच्या युझरने ट्विटरवर मलेशियन हॉटेलमधल्या पापडाचा फोटो शेअर केलाय. यात एका डिशमध्ये ठेवलेले 5-6 पापड दिसत आहेत. ‘पाककलेबाबत गुन्हा घडलाय’ अशी ओळ तिनं त्यासोबत लिहिली आहे. एकाच वेळी दोन समाजांचा अपमान करण्याची ही पद्धत आहे, असंही तिनं म्हटलंय. ‘Snitch by the Thieves’ असं मलेशियातल्या रेस्टॉरंटचं नाव आहे. विशेष म्हणजे या डिशची किंमत 27 मलेशियन रिगिट्स म्हणजेच 500 भारतीय रुपये इतकी आहे.

वाचा - एनर्जी देणाऱ्या या गोष्टी पुरुषांसाठी ठरू शकतात टक्कल पडण्याचे कारण!

या फोटोवर अनेक ट्विटर युझर्सनी तिखट प्रतिक्रिया दिल्यात. एका युझरने लिहिलंय, ‘मेक्सिकन की भारतीय, नक्की कोणत्या लोकांना जास्त अपमानकारक वाटेल याबाबत आश्चर्य वाटतंय.’ अशा पद्धतीने नाव देण्याबाबत एका युझरने आक्षेप घेतलाय. ‘मुगाचा पापड असेल, तर काय ब्लॅक डॉटेड नाचोज म्हणतील का?’ असं त्यानं म्हटलंय. '27 डॉलर्सच्या पापडापेक्षा 2 रुपयांमध्ये मसाला घालून मिळणारा पापड मला चालेल,' असंही त्याने म्हटलंय. खरं तर हे रेस्टॉरंट अमेरिकन नाही; मात्र युझर्सनी प्रतिक्रिया देताना अमेरिकन बर्गरचाही उल्लेख केलाय. 'बर्गर्सना अमेरिकन वडापाव म्हणून आपण त्याचा बदला घेऊ या', असं त्या युझरने म्हटलंय. अनेक युझर्सनी या फोटोवर टीका केलीय. हा गुन्हा असल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिलीय.

अलीकडे भारतीय खाद्यसंस्कृतीतल्या अनेक पदार्थांची नावं पाश्चिमात्त्य नावांनी सजू लागली आहेत. पोळी किंवा चपाती फ्लॅट ब्रेड किंवा नान म्हणून ओळखली जाते. तसंच आता पापडांच्या बाबतीत घडलं आहे.

First published:

Tags: Food