Lockdown 'घरात नटून थटून बसा, पण नवऱ्यांना त्रास देऊ नका' - Sexist सरकारी सूचनेमुळे जगभरात वाद

Lockdown 'घरात नटून थटून बसा, पण नवऱ्यांना त्रास देऊ नका' - Sexist सरकारी सूचनेमुळे जगभरात वाद

'महिला या आपल्या नवऱ्यांना त्रास देतात का? याबद्दल जे विनोद आणि टिंगल टवाळी केली जाते त्याला बळ मिळतं.'

  • Share this:

क्वालालंपूर 1 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे केवळ भारतातच नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये Lockdown आहे. ज्यांना शक्य असेल ते सगळेच लोक आपल्या घरातच बसून काम करत आहेत. हा व्हायरस जागतल्या 180 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलाय. गेली कित्येक दिवस घरातच बसून काम करावं लागत असल्याने लोक वैतागले आहेत. त्यामुळे सरकार आणि आरोग्य खातं लोकांसाठी मार्गदर्शक सूचना देत आहेत. अशा काही सूचना मलेशियाच्या सरकारने दिल्यात. त्यामुळे त्यांना जगभरच्या महिला संघटनांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे.

Work From Home करणाऱ्या महिलांसाठी मलेशिया सरकारने महिलांना सल्ला देण्यासाठी अनेक इन्फोग्राफिक्स प्रसिद्ध केलेत. त्यात महिलांना अनेक सल्ले देण्यात आले आहेत. त्यात म्हटलंय की, तुम्ही जरी घरात बसून काम करत असलात तरी मेकअप करून नटून थटून बसा, स्मार्ट दिसाल असा ड्रेस घाला, मात्र घरातच असलेल्या नवऱ्याला उगाच त्रास देऊ नका.

त्यांच्या या सल्ल्यानंतर महिला संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. महिला या आपल्या नवऱ्यांना त्रास देतात का? याबद्दल जे विनोद आणि टिंगल टवाळी केली जाते त्याला बळ मिळतं अशी टीका त्यांनी केलीय.

VIDEO... आणि आमदाराने धरले पोलिसांचे पाय, कोरोनाचा असाही इफेक्ट

या टीकेनंतर सरकारच्या संबंधित खात्याने ते ग्राफिक्स काढून टाकलं आहे. मात्र त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, चीनमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाव्हायरसची मुळ सुरुवात चीनमधील वुहानपासून झाली असे मानले जाते. मात्र सध्या चीनमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर काही डॉक्टरांनी सरकारला अलर्ट केले होते. मात्र सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. यातील एक डॉक्टर, एई फेन धक्कादायकरित्या बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.

Coronavirus : 'हस्तमैथुन करा', अमेरिकेत सरकारने दिला सल्ला

डॉ. एई फेन यांनी सार्वजनिकपणे कोरोनाबाबत जगाला इशारा दिला होता. त्यांनी चिनी सरकारवर टीकाही केली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार सरकारवर टीका केल्याबद्दल त्यांना अटक केले असावे. एई फेनवर चीनमधील कोरोनाशी संबंधित गुप्त माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप आहे.

First published: April 1, 2020, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading