क्वालालांपूर (मलेशिया), 11 मार्च : मलेशिया (Malaysia) मधील एका कोर्टाने गैर मुस्लिमांना (Non Muslims) देखील 'अल्लाह' (Allah) शब्द वापरण्यास परवानगी दिली आहे. मुस्लीम बहुल देशासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या विषयावरील सरकारने घातलेल्या बंदीला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टाने ख्रिस्ती प्रकाशनांना (Christian publications) 'अल्लाह' आणि अरबी भाषेतील अन्य तीन शब्द वापरण्यसाठी 35 वर्षांपासून असलेली बंदी रद्द केली आहे. सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आहे.
यापूर्वी मलेशियाच्या सरकारने अल्लाह हा शब्द वापरण्याची परवानागी ही फक्त मुसलमान नागरिकांनाच दिली होती. मुसलमान नागरिकांचा संभ्रम वाचावा तसंच त्यांचं धर्मांतर थांबावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकारचा निर्णय हा मलेशिया या एकमेव देशामध्ये होता. अन्य कोणत्याही मुस्लीम बहुल देशामध्ये हा निर्णय अस्तित्वात नाही.
मलेशियातील ख्रिश्चन नेत्यांनी सांगितलं की, 'अल्लाह शब्दाच्या वापरावरील बंदी चुकीची होती. माले भाषेतील ख्रिश्चन बऱ्याच काळापासून बायबल, प्रार्थना आणि अन्य गाण्यामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करताना 'अल्लाह' शब्दाचा वापर करतात. हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे.'
( वाचा : स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी, 'या' देशांमध्येही कडक आहेत नियम! )
यापूर्वी 2014 साली देशातील संघराज्य न्यायालयाने 'अल्लाह' शब्दावरील बंदी कायम ठेवली होती. उच्च न्यायालयाने त्याच्या विरुद्ध निर्णय दिला आहे. मलेशियातील सर्व नागरिक 'अल्लाह' शब्दाचा वापर करू शकतात, असं या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
मलेशियाची एकूण लोकसंख्या 3.2 कोटी असून त्यापैकी दोन तृतीयांश लोकसंख्या ही मुस्लीम आहे. भारतीय आणि चीनी वंशाचे अल्पसंख्याक नागरिक मलेशियात राहतात. तर देशातील ख्रिश्चनांचे लोकसंख्येतील प्रमाण हे 10 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: International, Muslim, World news