नोबेल पुरस्कार विजेती मलाला 5 वर्षांनी पाकिस्तानच्या भेटीवर

नोबेल पुरस्कार विजेती मलाला 5 वर्षांनी पाकिस्तानच्या भेटीवर

'गेल्या पाच वर्षांत प्रत्येक दिवशी मला मायभूमीला भेट द्यावीशी वाटत होती,' अशी भावनिक प्रतिक्रिया मलालाने यावेळी व्यक्त केली.

  • Share this:

30 मार्च : नोबेल पुरस्काराची सर्वांत तरुण मानकरी ठरलेली मलाला युसुफझाई गुरुवारी मायदेशी म्हणजेच पाकिस्तानच्या भेटीवर आली. 'गेल्या पाच वर्षांत प्रत्येक दिवशी मला मायभूमीला भेट द्यावीशी वाटत होती,' अशी भावनिक प्रतिक्रिया मलालाने यावेळी व्यक्त केली.

पाकिस्तानात परतल्यानंतर तिनं पंतप्रधान शाहीद अब्बासी यांची भेट घेतली. यावेळी मलालाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं अब्बासींनी म्हटलं. 'पाकिस्तानची मुलगी मायभूमीत परत आल्यानं मला खूप आनंद झालाय.. हे तुझंच घर आहे. तू आता सामान्य मुलगी नाहीस. तुझ्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे,' असं अब्बासींनी म्हटलं.

मुलींच्या शिक्षणाचे समर्थन करत असल्यानं मलालावर तालिबानी दहशतवाद्यांनी पाच वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. त्यातून बचावल्यानंतर तिला ब्रिटनमध्येच आश्रय मिळाला आहे.

First published: March 30, 2018, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading