मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ट्रम्प यांचा अमेरिकेतील भारतीयांना झटका, कोरोना संकटकाळातील बेरोजगारीमुळे एच-1B व्हिसावर मर्यादा

ट्रम्प यांचा अमेरिकेतील भारतीयांना झटका, कोरोना संकटकाळातील बेरोजगारीमुळे एच-1B व्हिसावर मर्यादा

मंगळवारी अमेरिकन सरकारने परदेशातून येणाऱ्या कुशल कामगार (skilled workers) वर्गाच्या व्हिसावर मर्यादा घालण्याचा  निर्णय घेतला आहे.

मंगळवारी अमेरिकन सरकारने परदेशातून येणाऱ्या कुशल कामगार (skilled workers) वर्गाच्या व्हिसावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी अमेरिकन सरकारने परदेशातून येणाऱ्या कुशल कामगार (skilled workers) वर्गाच्या व्हिसावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

वॉशिंग्टन, 07 ऑक्टोबर : कोरोनामुळे (Coronavirus) सर्व जगामध्ये मंदीची लाट आली आहे. त्यामुळे लाखो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामध्ये मंगळवारी अमेरिकन सरकारने परदेशातून येणाऱ्या कुशल कामगार (skilled workers) वर्गाच्या व्हिसावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या साथीमुळे अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. परिणामी या मर्यादा घालण्यात येणार आहेत. H-1B व्हिसा देण्यावर कडक निर्बंध घालणार असल्याचं सूतोवाच ट्रम्प सरकारने केलं आहे.  US मधील अंदाजे 500,000 एच -1 बी व्हिसाधारकांपैकी बहुतेक भारत आणि चीनमधील लोक आहेत.त्यामुळे अमेरिकेत एच-1 व्हिसावर राहणाऱ्या भारतीयांना हा धक्का मानला जात आहे.

अमेरिकेतील होमलँड सिक्युरिटी (Department of Homeland Security DHS) आणि कामगार अधिकार विभागाच्या माहितीनुसार, एच-1बी व्हिसा कुणाला मिळेल आणि त्यांना किती पगार दिला जाईल याबाबत नव्या नियमांद्वारे माहिती दिली जाईल आणि लवकरच हे नियम जाहीर  केले जातील.

(हे वाचा-OMG! ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossil ची किंमत 2,33,48,51,400 कोटी)

कार्ववाहक उपसचिव केन कुचीनेल्ली (Acting Deputy Secretary Ken Cuccinelli) म्हणाले की डीएचएसच्या नवीन नियमांनुसार अर्जदारांपैकी एक तृतीयांश अर्जदारांना व्हिसा नाकारला जाऊ शकतो. नव्या नियमानुसार एच1 बी व्हिसाधारकांसाठी ज्या स्पेशॅलिटी पोस्ट अमेरिकी कंपन्यांनी तयार केल्या आहेत त्यांची संख्या मर्यादित करावी लागू शकते. तसंच या प्रोग्रॅमअंतर्गत अमेरिकेत नोकरी करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगारांवरही मर्यादा येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जुलै महिन्यात एच -1 बी व्हिसा देण्याबाबत या वर्षाच्याअखेरपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंदी घातली होती. कुचीनेल्ली आणि कामगार उप-सचिव पॅट्रिक पिझला सांगितले  एच 1 बी व्हिसा योजनेमध्ये कंपन्या अमेरिकी नागरिकांना नोकरीवरून काढून परदेशी कर्मचाऱ्यांना कमी पैशांत नोकरी देत आहे.  त्यामुळे अमेरिकन कामगारांना चांगल्या पगाराच्या, मध्यमवर्गीय स्तराच्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. यामुळे बेकारी वाढत आहे. अमेरिकी लोकांना कमी पगारांत काम करावं लागतंय. हे चूक आहे, अशी या योजनेवर टीका केली जात आहे.

(हे वाचा-पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का? आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO)

एच -1 बी कार्यक्रम हा माजी राष्ट्ध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी सुरू केला होता. तांत्रिक क्षेत्रातील भरभराट सुरू असताना कंपन्यांना पात्र कामगार मिळवणे कठीण जात होतं. तसंच परदेशी कामगारांना आयात करण्यासाठी आणि कंपनीच्या सोयीसाठी हा एच -1 बी व्हिसा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता.

अमेरिकन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार कॉम्प्युटर प्रोग्रॅमर, अकाउंटंट, आर्किटेक्ट आणि डेटाबेस प्रशासक यासारख्या नोकर्‍यांसाठी अमेरिकेला दरवर्षी 85,000 एच -1 बी व्हिसा देता येतात. सुरुवातीला तो तीन वर्षांसाठी असतो नंतर त्यांचं नूतनीकरण केलं जाऊ शकतं. नवीन नियम लागू करण्याआधी ते फेडरल रजिस्टरमध्ये प्रसिद्ध केले जातील आणि ते लागू होण्याआधी त्यावर नागरिकांना कमेंट देखील नोंदवता येईल.

First published:

Tags: Donald Trump