POK मध्ये इमरान खान आणि लष्कराविरुद्ध बंड; स्वातंत्र्यासाठी आंदोलन पेटले!

POK मध्ये इमरान खान आणि लष्कराविरुद्ध बंड; स्वातंत्र्यासाठी आंदोलन पेटले!

इमरान खान यांच्याविरुद्ध देशातील विरोधी पक्ष एक होताना दिसत असताना आता त्यांच्यासाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे.

  • Share this:

मुझफ्फराबाद, 22 ऑक्टोबर: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची डोकेदुखी काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारताला खोट पाडण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून देखील इमरान खान यांना यश आले नाही. दहशतवाद्यांना मदत करणारा देश अशी पाकिस्तानची ओळख जगभर झाली आहे. त्यामुळेच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या इमरान खान यांना मदत करण्यास कोणताही देश अथवा संस्था तयार नाही. अशातच आता इमरान यांना पाकमधूनच विरोध सुरु झाला आहे. इमरान खान यांच्याविरुद्ध देशातील विरोधी पक्ष एक होताना दिसत असताना आता त्यांच्यासाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला पाक व्याप्त काश्मीर(Pakistan Occupied Kashmir)मधील सर्वसामान्य नागरिकांनी इमरान खान (Imran Khan)सरकार आणि पाकिस्तानी लष्करा(Pakistani Army)च्या विरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. POKमधील नागिरकांनी रस्त्यावर येऊन लष्कर आणि सरकारविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी रात्री POKमध्ये पाकिस्तानविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे हे आंदोलन स्वातंत्र्यासाठी होते. POKमधील नागरिकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. या आंदोलनाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

POKमधील नागरिकांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत आणि पंतप्रधान मात्र खोट खोट रडत आहेत. पाकिस्तान येथील नागरिकांना फक्त आश्वासने देत आहे. आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी पाकिस्तान लष्कर आणि सरकारने येथे अवैधपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानी लष्कर मंगळवारी काही परदेशातील राजकीय नेत्यांना POKच्या दौऱ्यावर घेऊन जाण्याच्या ठिक आधी पाक लष्कराविरुद्ध मुझफ्फराबादच्या रस्त्यावर जनता उतरली. पाक व्याप्त काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत सुरु आहे आणि शांतता असल्याचा दावा पंतप्रधान इमरान खान नेहमी करत असतात. जागतीक व्यासपीठावरून बोलताना देखील ते नेहमी POK आणि जम्मू-काश्मीरची तुलना करत असतात. पण मंगळवारच्या घटनेमुळे परदेशी राजकीय नेत्यांच्या समोर पाकिस्तानची पोलखोल झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading