किंशासा, 10 ऑक्टोबर: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशात जहाज नदीत उलटल्याने (ship capsized in the Congo river) 50 हून अधिक लोकांचा मृत्यू (51 people death) झाला आहे. या अपघातात अद्याप 60 हून अधिक जण बेपत्ता (60 people missing) आहेत. हा अपघात कांगो नदीत झाला आहे. उत्तर -पश्चिमेतील मोंगाला प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते नेस्टर मॅग्बाडो यांनी जहाज दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, आतापर्यंत 51 जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर 60 हून अधिक लोकं अजूनही बेपत्ता आहेत. या अपघातात 39 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, जहाजावर चढण्यापूर्वी प्रवाशांची मोजणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे जहाजातील आसन क्षमतेवरून बेपत्ता लोकांच्या आकड्याचा अंदाज लावला जात आहे. तसेच सध्या शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांना कसं वाचवता येईल, यासाठी बचाव दलाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा-बापरे! आत्महत्येसाठी 9 व्या मजल्यावरुन मारली उडी; या एका गोष्टीमुळे तरुण वाचला
खरंतर, कॉंगो देशात जहाज अपघात होणं सामान्य बाब बनली आहे. याठिकाणी बऱ्याचदा क्षमतेहून अधिक प्रवासी जहाजेत बसवले जातात. तसेच बहुतेक लोकं जल प्रवासादरम्यान लाईफ जॅकेट्स परिधान करत नाहीत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये माई-नदोम्बे प्रांतातील कांगो नदीत एक जहाज उलटली होती. यामध्ये 60 लोकांचा मृत्यू झाला होता. यावेळी संबंधित जहाजेत तब्बल 700 हून अधिक प्रवासी होते. क्षमतेहून अधिक प्रवासी बसवल्याने हा अपघात झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
हेही वाचा-अंगावर कोसळली 5 मजली इमारत; अनेक तासांनी चिमुकलीला त्या अवस्थेत पाहून सगळे हैराण
याशिवाय, जानेवारी 2021 मध्ये, किवू तलावात एक प्रवासी बोट बुडाली होता. ज्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन मुलं आणि एका महिलेचा समावेश होता. तत्पूर्वी, मे 2020 मध्ये देखील किवु तलावात एक बोट पलटी झाली होती. यामध्ये 8 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीसह 10 जणांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.