पॅरिस, 11 ऑक्टोबर : फ्रान्समध्ये (France Plane Crash) एक भीषण अपघात झाला. दोन विमानांमध्ये जबरदस्त टक्कर (Plane Collision) झाल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिली. शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पश्चिम फ्रान्समध्ये ही घटना घडली. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, मायक्रोलाईट विमानात दोन लोकं होती. या विमानाची टक्कर DA40 या प्रवासी विमानाशी झाली. प्रवासी विमानात 3 लोकं होती. या पाचही लोकांचा जागीच मृत्यू झाला.
मायक्रोलाइट विमान एका घराजवळ लॅंड झाले तर प्रवासी विमान निवासी क्षेत्रापासून बरेच दूर गेले. दिलासादायक बाब म्हणजे ज्या घराच्या जवळ माइक्रोलाइट विमान कोसळले त्यात केवळ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. इतर कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या सुमारे 50 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी विमानातील आग विझविण्याचा प्रयत्न केला. अनेक तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
वाचा-सुसाट दुचाकी-कारची धडक; 2 फूट उंच उडून तरुण खाली पडला, पाहा थरारक VIDEO
Five killed after small plane and a microlight collide in Loches, France. https://t.co/tfWfm59YKd pic.twitter.com/r4rKauKHRQ
— Breaking Aviation News & Videos (@breakingavnews) October 10, 2020
वाचा-हायवेवर झोपून काढत होते Naked Selfie, मागून आली पोलिसांची गाडी आणि...
दरम्यान, सध्या या अपघातात आतापर्यंत मरण पावले गेलेल्या लोकांची ओळख पटलेली नाही. या दुर्घटनेचा तपास घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोटीयर्स शहरातून उड्डाण घेतल्यानंतर हे प्रवासी विमान कोसळले. हे विमान लोशेपासून 62 मैलांच्या अंतरावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.