केपटाउन, 23 नोव्हेंबर : महात्मा गांधी (mahtama gandhi) यांचे पणतू सतिश धुपेलिया (Satish Dhupelia) यांचं कोरोनाची (Corona) लागण झाल्यामुळे निधन झाले आहे. वयाच्या 66 वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) अखेरचा श्वास घेतला. तीनच दिवसांपूर्वी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता.
सतिश धुपेलिया यांना न्युमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या निधनाबद्दल वृत्त त्यांच्या बहीण उमा धुपेलिया-मेस्थरी यांनी दिले.
मुलाला मुखाग्नी देताना पाहून अश्रू अनावर, शहीद संग्राम पाटील अनंतात विलीन
सतिश धुपेलिया यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.
महात्मा गांधी यांचे चिरंजीव मणिलाल गांधी यांचे ते वंशज आहे. महात्मा गांधी यांनी आपले काम सुरू ठेवण्यासाठी मणिलाल यांना दक्षिण आफ्रिकेत ठेवले होते. महात्मा गांधी यांचे पणतू सतिश धुपेलिया हे मीडियात काम करत होते. मीडियात त्यांनी व्हिडीओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून काम केले. त्याचबरोबर ते दरबनजवळील गांधी विकास ट्रस्टच्या कामकाजात ते सक्रिय होते. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांसोबत काम केले होते.
शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी फटकारले, म्हणाले...
आफ्रिका खंडात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येन 20 लाखांचा टप्पा गाठला आहे. दुसऱ्या लाटेत संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.