युरोपच्या सर्वोच्च शिखराजवळ 'मावळ्यां'नी फडकवला 73 फुटाचा तिरंगा

युरोपच्या सर्वोच्च शिखराजवळ 'मावळ्यां'नी फडकवला 73 फुटाचा तिरंगा

कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना या संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी युरोपातील सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवादन केलं.

  • Share this:

मॉस्को(रशिया) 14 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी मावळ्यांनी उत्तम कामगिरी केलीय. 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केला असून भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 73 फुटी तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवलाय. या चढाईत 10 वर्षाचा साई कवडेही सहभागी झाला होता. या मोहिमेत तुषार पवार, भूषण वेताळ, सागर नलावडे आनंद बनसोडे यांचाही समावेश होता.  आनंद बनसोडे यांनी जुलै 2014 मध्ये हे शिखर सर केलं होतं. आता या टीमला मार्गदर्शक म्हणून पुन्हा या मोहिमेवर आले आहेत.

बाबासाहेबांचे विचार संपविण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न - कवाडे

360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याची मोहीम आयोजित केली गेली होती. यात 10 वर्षाचा साई कवडे  हा एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे. 15 ऑगस्ट रोजी अंतिम चढाईला निघण्यापूर्वी आनंद बनसोडे, साई कवडे, कोल्हापूरचा सागर नलावडे, औरंगाबादचा भूषण वेताळ, साताऱ्याचा तुषार पवार यांनी 73 फुटी तिरंगा एलब्रूस बेसकॅम्प (13000 फूट) वर फडकावून विदेशात सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. याची नोंद वेगवेगळ्या बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे असे 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितलं.

बलात्कारामुळे झाला मुलाचा जन्म? मृत चिमुकल्याची होणार DNA टेस्ट

एलब्रूस मोहिमेनंतर 360 एक्सप्लोररची टीम भारतात येऊन लगेच कोल्हापूर सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाणार आहे. कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त लोकांना या संकटातून सावरण्याची प्रेरणा देण्यासाठी युरोपातील सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवादन केलं.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र, स्वातंत्र्य दिनी होणार गौरव

360 एक्सप्लोररची ही विश्वविक्रमी टीम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावरील माती, छत्रपतींची प्रतिमा एलब्रूस शिखरावर घेऊन जाणार आहे. पुण्यातील साई कवडे हा सर्वात लहान आशियाई या शिखरावर प्रथम पाऊल ठेवणार आहे त्यामुळे गिर्यारोहन क्षेत्रातील संपूर्ण देशाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2019 05:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading