Home /News /videsh /

VIDEO : '...तर देशाचा रेप नाही गॅंगरेप झालाय', पाकच्या राष्ट्रपतींचे धक्कादायक वक्तव्य

VIDEO : '...तर देशाचा रेप नाही गॅंगरेप झालाय', पाकच्या राष्ट्रपतींचे धक्कादायक वक्तव्य

एकीकडे पाकिस्तान उपासमारी आणि कोरोना अशा दोन महत्त्वाच्या समस्यांनी ग्रासलेला असताना राष्ट्रपतींनी केलेल्या या वक्तव्यावर जगभरातून टीका केली जात आहे.

    इस्लामाबाद, 23 एप्रिल : कोरोनामुळं पाकिस्तानचेही कंबरडे मोडले आहे. एकीकडे कर्जात बुडालेल्या पाककडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सामग्रीही नाही आहे. पाकमध्ये कोरोनाने 10 हजारांचा आकडा पार केला आहे. तर, 212 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या 10 दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सगळ्यात पाकचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी धक्कादायक वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतंत्र वीज कंपन्यांवरील (IPPs) अहवाल प्रसिद्ध झाला होता. हा अहवाल वाचून आपण नाराज असल्याचे सांगत डॉ. आरिफ अल्वी यांनी देशाचा केवळ बलात्कारच नाही तर माफियांनी सामूहिक बलात्कार केला आहे, असे  वक्तव्य केले. जिओ न्यूजच्या कार्यक्रम कॅपिटल टॉकमध्ये अॅंकर हमीद मीरशी बोलताना अल्वी म्हणाले की, “मी वीज कंपन्यांवरील तपास अहवाल वाचला आहे. वीज क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा संदर्भ घेत देशाला 2 कोटी 66 लाख रुपये दरदिवशी तोटा होत असल्याचे सांगितले. दरम्यान राष्ट्रपतींनी मुस्लिम समुदायासाठी लॉकडाऊनच्या परिस्थितीत देशातील सर्व सहमतीने मशिदी उघडण्यास सहमती दर्शविली आहे. वाचा-धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि... वाचा-मालेगावमध्ये धक्कादायक प्रकार, लॉकडाऊनमुळे जमावाने पोलिसांवर घेतली धाव याबाबत सांगताना अल्वी यांनी, "धार्मिक विद्वानांशी केलेला करार इज्मा-ए-उम्मत (मुस्लिम समुदायाची एकमत) होता आणि त्याचे उल्लंघन केल्याने पाप म्हणून वर्गीकरण केले जाईल", असे सांगितले. वीज कंपन्यांच्या मुद्दय़ांवर राष्ट्रपती म्हणाले की, पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांना या अहवालाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी भाड्याने देण्याचा सल्ला दिला होता आणि कोणत्याही भ्रष्टाचारात सामील झालेल्यांवर कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला होता. राष्ट्रपती म्हणाले की, IPPची स्थापना 1994, 2002 आणि 2014मध्ये झालेल्या ऊर्जा धोरणे आणि करारांमुळे झाली. वाचा-LockDown:मंदिराबाहेर झाला अनोखा विवाह,हिंदू मुलानं बांधली मुस्लीम मुलीशी लग्नगाठ एकीकडे पाकिस्तान उपासमारी आणि कोरोना अशा दोन महत्त्वाच्या समस्यांनी ग्रासलेला असताना राष्ट्रपतींनी केलेल्या या वक्तव्यावर जगभरातून टीका केली जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या