Home /News /videsh /

ऐकावं ते नवल! गर्भनिरोधक म्हणून वापरलं जात होतं टॉयलेट क्लीनर?

ऐकावं ते नवल! गर्भनिरोधक म्हणून वापरलं जात होतं टॉयलेट क्लीनर?

लायजॉलसारखे (Lysol) कीटकनाशक Coronavirus वर उपचार म्हणून वापरू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हेच लायजॉल टॉयलेटर क्लीनर एकेकाळी गर्भनिरोधक (Contraceptive) म्हणून वापरलं जात होतं.

    वॉशिंग्टन, 27 एप्रिल : लायजॉलसारखे (Lysol) कीटकनाशक कोरोनाव्हायरसवर उपचार ठरू शकतात, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून आले. शिवाय असे कीटकनाशक औषध म्हणून वापरू नयेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे, एकेकाळी लायजॉल टॉयलेट क्लीनर गर्भनिरोधक (Contraceptive) म्हणून वापरलं जात होतं. त्याची जाहिरातच तशी करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आले होते. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांचा प्रचार कमी होता. सामान्य लोकांना याबाबत फारशी माहिती नव्हती आणि कंडोमसारखे उपाय खूप खर्चिक होते, लोकांना त्याची लाजही वाटत असे. त्यावेळी 1920 च्या दशकात लाइजॉल (Lysol) या कीटकनाशक ब्रँडची अशी मार्केटिंग करण्यात आली की महिलांच्या गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी हा एक मोठा ब्रँड बनला होता. हे वाचा - ना मृत्यू, ना कोमा; तर किम जोंग 'या' कारणामुळे झालेत अंडरग्राउंड त्यावेळी गर्भनिरोधकासाठी सोयी किंवा वैद्यकीय सल्ले मिळत नव्हते, अशावेळी या जाहिरातींनी बरेच गैरसमज पसरवले. अमेरिकेतील गर्भनिरोधकाच्या इतिहासावर पुस्तक लिहिणाऱ्या एंड्रिया टोन यांनी नमूद केल्यानुसार, 1940 च्या दशकात अमेरिकन महिला लायजॉल गर्भनिरोधक ब्रँड समजू लागल्या. अशा प्रकारच्या जाहिरातींचे दावे खोटे ठरू लागले असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आलं आहे. 1911 पर्यंत लॉयजॉलच्या वापरामुळे डॉक्टरांनी विषबाधेची 193 प्रकरणं नोंदवली होती. गुप्तांगामध्ये जळजळ झाल्याने 5 मृत्यूही झाल्याचा आकडा समोर आला. टोन यांनी आपल्या पुस्तकात 21 आत्महत्या झाल्याचीही नोंद केली आहे. 1933 मध्ये एका अभ्यासात दिसून आलं की, लायजॉल वापरल्यानंतरही महिला गर्भवती झाल्या. हे वाचा - Coronavirus चा स्रोत समजल्या जाणाऱ्या वटवाघळाची या गावात केली जाते पूजा मृत्यू, इन्फेक्शनसंबंधी रिपोर्ट आल्यानंतर लायजॉलने आणखी आक्रमक मार्केटिंग केली आणि हे उत्पादन महिलांसाठी सुरक्षित असल्याचं सांगितलं. या उत्पादनातील क्रेजॉल घटक काढून ऑर्थो-हायड्रॉक्सिफिनाइल फॉर्म्युला वापरण्यात आला आहे, जेणेकरून ज्वलनाची समस्या उद्भवणार नाही, असा दावा करण्यात आला. लेन अँड फिंक कंपनीने त्यावेळी लायजॉलला टॉयलेट क्लिनरसह महिलांच्या स्वच्छतेसाठीही उपयुक्त असल्याचं म्हटलं होतं. लायजॉलला गर्भनिरोधक का मानण्यात आलं? टोन यांच्या मते, या जाहिरातींमुळे महिलांमध्ये हीनभावनाही विकसित होऊ लागली. तर दुसरीकडे अमेरिकेत 1965 आणि 1972 पर्यंत जन्म नियंत्रण म्हणजे गर्भनिरोध गैरकायदेशीर होतं. त्यामुळे गर्भनिरोधकांबाबत जागरूकता नव्हती. अशा परिस्थितीत जाहिरातींनी असे गैरसमज पसरवण्याचं काम केलं. 40 वर्षांनंतर प्रभाव संपला 1965 मध्ये विवाहित आणि 1972 मध्ये एकट्या प्रौढांसाठी गर्भनिरोध कायदेशीर झाल्यानंतर गर्भनिरोधक म्हणून वैध आणि मान्यताप्राप्त अशी औषधं, उपकरण, पद्धती विकसित झाल्या. त्यामुळे गर्भनिरोध म्हणून लायजॉलबाबत जो एक समज निर्माण झाला होता तो 1960 च्या दशकात हळूहळू संपुष्टात आला आणि त्यानंतर लायजॉल फक्त एक कीटकनाशक टॉयलेट क्लीनरचा ब्रँड राहिला. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या