कोरोना: बायकोला एकटीलाच जावं लागतं केमोथेरेपीला, नवऱ्याने जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

कोरोना: बायकोला एकटीलाच जावं लागतं केमोथेरेपीला, नवऱ्याने जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बायकोच्या दु:खात आपण सहभागी होऊ शकत नाही याचं त्याला वाईट वाटलं.

  • Share this:

नवी दिल्ली 08 एप्रिल : कोरोनामुळे जगभरातल्या माणसांचं जगणच बदललंय. तीन महिन्यांपूर्वीच्या गोष्टी आता बदलल्या आहेत. आता कुणाला हस्तांदोलन करता येत नाही की कुणीची गळाभेटही घेता येत नाही. आपल्याच प्रियजनांनापासून आपल्याला मुकावं लागत आहे. व्हायरसमुळे सगळेच एकमेकांपासून दुरावले आहेत. अशाही परिस्थितीत जिव्हाळा आणि प्रेम कायम ठेवण्यासाठी लोक उपाय काढत आहेत. अशाच एका नवरा बायकोची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नवऱ्याचं बायकोवर प्रेम पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. ट्वीटरवर कायम सक्रिय असणारे वाला अफशर यांनी त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.

त्या माणसाच्या बायकोला कमोथेरेपी घ्यावी लागते. त्यामुळे तिला आठवड्यातले काही दिवस त्यासाठी क्लिनिकमध्ये जावं लागतं. कॅन्सरवर उचापर असलेली कमोथेरेपी ही अतिशय त्रासदायक ट्रिटमेंट आहे. मात्र रुग्णांना त्या दिव्यातून जावच लागतं.

त्या महिलेसोबत आत्तापर्यंत कायम तिचा नवरा सोबत असायचा. मात्र कोरोनामुळे आता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागत आहे. त्यामुळे सध्या त्याला तिच्यासोबत त्या कठिण काळात सोबत राहता येत नाही. बायकोला एकटीलाच केमोसाठी जावं लागत आहे. त्यामुळे नवऱ्याने त्यावर एक नामी शक्कल लढवली. बायकोच्या दु:खात आपण सहभागी होऊ शकत नाही याचं त्याला वाईट वाटलं.

बायको उपचारसाठी क्लिनिकमध्ये गेल्यावर तो क्लिनिकच्या बाहेर आपली कार पार्क करतो आणि खुर्ची टाकून पुस्तक वाचत बसतो. आपल्या खुर्ची समोर त्याने एका मोठ्या बोर्डवर जे लिहिलंय ते वाचून सगळेच तिथं थांबतात आणि त्याचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहून कौतुक करतात. "I can't be with you but I'm here loving you!" असं त्याने त्या बोर्डवर लिहिलेलं आहे. असं लिहून त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं. त्यांच्या या प्रेमाला जगभरातून आता दाद मिळतेय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 11:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading