मेरीलँड, 31 डिसेंबर : आपल्याला लॉटरी (Lottery) लागावी आणि रातोरात मालामाल व्हावं, असं जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. लॉटरीच्या पैशांनी आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू, असं स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण खूपच कमी जणांच्या बाबतीत असं होतं. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतल्या एका महिलेबाबत घडला आहे. लॉटरी व्हेंडिंग मशिन (Lottery Vending Machine) वापरताना चुकून बटण दाबलं गेलं आणि त्या महिलेचं नशीबच पालटलं आहे. विश्वास बसणार नाही; पण त्या महिलेला चक्क 50 हजार डॉलर्सची (भारतीय चलनात 37 लाख 31 हजार 710 रुपये) लॉटरी (Lottery Prize) लागली. नशीब बदलायला वेळ लागत नाही, असं म्हटलं जातं. त्याचा या घटनेतून प्रत्यय आला.
'ग्लोबल टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत (America) मेरीलँडमध्ये (Maryland) राहणाऱ्या एका महिलेसोबत सुखद अशी ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला हॅगर्सटाउनमधल्या हाफवे लिकर्समध्ये (Halfway Liquors) लॉटरी व्हेंडिंग मशीनजवळ उभी होती. यादरम्यान चुकून महिलेच्या हातून लॉटरी मशीनचं बटण दाबलं गेलं. बटन दाबताच मशीनमधून $20 स्क्रॅच-ऑफ गेमऐवजी 5 डॉलरचं डिलक्स क्रॉसवर्ड म्हणजे 50 हजार डॉलर्स लॉटरीचं तिकीट (Lottery Prize won by Woman) बाहेर आलं.
(BREAKING : लग्नाला आता 50 लोकांनाच परवानगी, नवीन नियमावली जाहीर)
या संपूर्ण घटनेतला मनोरंजक प्रकार म्हणजे, तिकीट पाहिल्यानंतर आपल्याला 50 हजार डॉलर्सची लॉटरी लागली आहे, हे महिलेच्या लक्षातच आलं नाही. हवं असलेलं तिकीट न आल्याने महिला नाराज झाली. क्रॉसवर्ड गेम आवडत नसल्याने महिला ते तिकीट घेऊ घरी आली. घरी आल्यानंतर मेरीलँड लॉटरी स्मार्टफोन अॅपवरून तिने तिकीट स्कॅन (Mobile App) केलं. तिकीट स्कॅन करताच महिलेला अभिनंदनासह $50,000 डॉलर जिंकल्याचा मॅसेज आला. हे पाहताच तिला आश्चर्याचा धक्काच बसला. एवढी रक्कम एका झटक्यात मिळणार आहे, हे पाहून तिचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, असं वृत्त आजतक वाहिनीने दिलं.
(अभिनेत्री Monalisa चे बोल्ड फोटो पाहुन चाहते भडकले, म्हणाले...)
आपल्याला लॉटरी लागली आहे, हे महिलेला खरं वाटत नव्हतं. तेव्हा तिने लॉटरी तिकीट कार्यालय (Lottery office of Maryland) गाठलं. तिथे तिने पुन्हा लॉटरी तिकीट स्कॅन केलं. तेव्हा खरंच आपल्याला 50 हजार डॉलर्सची लॉटरी लागली आहे, याची महिलेला खात्री झाली. अगदी काहीही न करता जॅकपॉट (Lottery Jackpot) लागल्याने तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. असं म्हणतात, की एखाद्याचं नशीब अचानक पालटतं, ते असंच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.