मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

उशिरापर्यंत काम करण्याचा मोठा धोका; WHO ने केलं अलर्ट

उशिरापर्यंत काम करण्याचा मोठा धोका; WHO ने केलं अलर्ट

अधिक वेळ काम करणाऱ्यांवर एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानुसार, 2016 मध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या 745,000 लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 मे : जागतिक आरोग्य संघटना WHO ने, जगभरात उशिरापर्यंत काम करण्याची सवय असणाऱ्या हजारो लोकांचा दरवर्षी मृत्यू होत असल्याचा खुलासा केला आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे येणाऱ्या काही काळात हा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अधिक वेळ काम करणाऱ्यांवर एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानुसार, 2016 मध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या 745,000 लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हे आकडे 2000 सालच्या तुलनेत जवळपास 30 टक्के अधिक आहेत.

WHO चे पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि आरोग्य विभागाच्या निर्देशक मारिया नीरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला 55 तास किंवा त्याहून अधिक काम करणं आरोग्यासाठी एक गंभीर धोका ठरत आहे. कामगारांना अधिक संरक्षण देण्यासाठी आम्ही ही माहिती देत असल्याचं त्या म्हणाल्या.

WHO आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अभ्यासातून असं समोर आलं, की अधिकतर पीडित (72%) पुरुष होते आणि मध्यम वयोगटातील किंवा त्याहून अधिक वयाचे लोक होते. अभ्यासानुसार, 10 वर्षानंतरही बऱ्याचदा अशा लोकांचा मृत्यू होतो.

एकूण 194 देशांच्या आकडेवारीवर हा अभ्यास आधारित आहे. या अभ्यासानुसार, आठवड्यातून 55 तास किंवा त्याहून अधिक काम केल्यास स्ट्रोकचा धोका 35 टक्के आणि 35 ते 40 तासांच्या तुलनेत हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका 17 टक्के अधिक असतो.

(वाचा - ऑर्डर केलं माउथवॉश आणि डिलीव्हरीवेळी आला 13000चा स्मार्टफोन, पाहा पुढे काय झालं)

हा अभ्यास 2000 ते 2016 दरम्यान करण्यात आला आहे. त्यामुळे यात कोरोना काळात प्रभावित झालेल्या लोकांचा कोणताही डेटा नाही. 'दीर्घ कामकाजाचा जीवनावर होणारा परिणाम' याबद्दल एनव्हायरमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये जगातील पहिला अभ्यास प्रकाशित झाला आहे.

First published:

Tags: Work from home, Worker