हिवाळ्यात येणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट, पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती

Corona Virus: कोरोनाच्या दुसऱ्या (Second Wave) लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आणि नुकतीच सावरत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा ढेपाळली.

Corona Virus: कोरोनाच्या दुसऱ्या (Second Wave) लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आणि नुकतीच सावरत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा ढेपाळली.

  • Share this:
लंडन, 21 जून: सगळ्या जगाला गेल्या दीड वर्षापासून वेठीस धरणाऱ्या कोरोनाविषाणूचं (Coronavirus) संकट अद्यापतरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पहिल्या लाटेपेक्षा अधिक विनाशकारी दुसरी लाट (Second Wave) आता कुठे ओसरत आहे, तोपर्यंत तिसऱ्या लाटेची (Third Wave) टांगती तलवार डोक्यावर लटकू लागली आहे. या तिसऱ्या लाटेत तर लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. त्यामुळं या लाटेची भीती अधिक आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Variant) अतिशय वेगानं याचा प्रसार झाला. त्यामुळं रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळं आरोग्य यंत्रणा कोलमडून पडण्याची वेळ आली. तर ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्यानं भारतासारख्या देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आणि नुकतीच सावरत असलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा ढेपाळली. दरम्यान, कोरोनाविषाणू प्रतिबंधक लस (Vaccine) आल्यानं सुटकेचा मार्ग तर सापडला आहे. पण जगभरात सर्वांचं लसीकरण (Vaccination) करणं हे मोठं आव्हान आहे. त्याचवेळी कोरोनाचा विषाणू सतत आपल्या रचनेत बदल करत आहे. त्यामुळे त्याच्या नवीन व्हेरिएंटवर सध्याची लस उपयुक्त ठरेल का हे आव्हान आहे. अशा सगळ्या परिस्थितीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जगाला भेडसावू लागली आहे. ब्रिटनमध्ये (UK) शास्त्रज्ञांनी हिवाळ्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून, या लाटेमुळे सरकारकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनची (Lockdown)घोषणा होऊ शकते, असा इशारा दिला आहे. हिवाळा कठीण काळ ठरू शकतो : सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कोरोनाविषाणूचा एक नवीन प्रकार या हिवाळ्यात (Winter) ब्रिटनमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येणारा हिवाळा अतिशय त्रासदायक ठरू शकतो. या लाटेत मुले आणि वृद्ध मोठ्या संख्येनं या विषाणूला बळी पडू शकतात. हेही वाचा-  सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी आतापर्यंतची सर्वांत मोठी बातमी देशात लॉकडाउनची दाट शक्यता : ब्रिटिश सरकारची सल्लागार संस्था ‘सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सी’नं (SAG) हा इशारा दिला असल्याचं वृत्तसंस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. एसएजेचे सदस्य प्रोफेसर कॉलम सेम्पल यांच्या मते, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे देशात लॉकडाऊन लावण्याची गरज भासू शकते. हा हिवाळ्याचा सीझन यामुळे धोकादायक ठरण्याची शक्यता असून, अनेक अडचणींना सामोरे जावं लागण्याची चिन्हे आहेत. पुढच्या वर्षीचा परिस्थिती सुधारेल आणि सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. विषाणूशी लढा देऊ शकतो : ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ विभागाचे (Public Health) संचालक सुसान हॉपकिन्स यांनीही याबाबत इशारा दिला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे या हिवाळ्यात लॉकडाऊन लावावा लागू शकतो. विषाणूशी लढण्यासाठी कोरोना लस, चाचणी आणि इतर उपचार अशा सर्व सुविधा सज्ज असतील. त्यामुळे ही लढाई यशस्वीपणे लढू शकतो; मात्र काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published: