आईला सोबत घेऊन मुलगी हनीमूनला गेली, पतीचा सासूवर जडला जीव अन् लग्नच उरकून टाकलं

आईला सोबत घेऊन मुलगी हनीमूनला गेली, पतीचा सासूवर जडला जीव अन् लग्नच उरकून टाकलं

ज्या आईने मला जन्म दिला. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला त्यानेच मला धोका दिला. माझ्या आयुष्यातला हा सर्वात वाईट क्षण होता.

  • Share this:

लंडन, 19 जानेवारी : लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, दोन कुटुंबांच्या नात्यांची सुरूवात असते. कोणत्याही मुलीचे आई-वडील हे आपल्या मुलींचा संसार चांगला व्हावा असा आशीर्वाद देऊन मुलींचा कन्यादान करतात. परंतु, एक अशी घटनासमोर आली आहे. ज्यामुळे नातेसंबंधाचा पार विचका झाला आहे. हनीमूनला जाताना पत्नीने आपल्या आईला सोबत घेतले. पण हनिमूनला गेल्यावर जावई आणि सासूचे प्रेमसंबंधच जुळले आणि दोघांनी लग्नही उरकून टाकले.

ही घटना लंडनमधील घडली. ट्विकेनहम  इथं राहणारी एक मुलगी आपल्या आईला हनीमूनला सोबत घेऊन गेली होती. पण पतीला आपल्या सासूवरच प्रेम जडले त्यानंतर काही दिवसात त्याने पत्नीशी काडीमोड घेऊन सासूसोबतच संसार थाटला.

mirror.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील  ट्विकेनहम इथं राहणाऱ्या 34 वर्षीय लॉरेनने आपला प्रियकर पॉलसोबत लग्न करून खूश होती.  लॉरेन आणि पॉल गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. लग्नाआधीच त्यांना एक मुलगा सुद्धा होता. लॉरेनने सांगितलं की, लग्नानंतर आम्ही हनीमूनला गेलो होतो. तेव्हा मी माझ्या आईला सोबत फिरायला नेलं होतं. या दरम्यान पॉल आणि माझ्या आईमध्ये चांगलीच केमिस्ट्री जमली होती. दोघे ऐकमेकांच्या जवळ आले होते. परंतु, लॉरेनला दोघांवर कधीच संशय आला नाही की त्या दोघांमध्ये काही सुरू आहे.

आईने दिला पतीच्या मुलाला जन्म

परंतु, 8 आठवड्यानंतर लॉरेनला जेव्हा सत्य परिस्थितीत समजली तेव्हा तिच्या पायाखालीच जमीन सरकावी, असा हादरा बसला. पॉल आणि लॉरेनच्या आईचे प्रेमसंबंध जुळले असल्याचं तिला कळलं. एवढंच नाहीतर 9 महिन्यानंतर तिच्या आईने पॉलच्या मुलाला जन्मही दिला. सुरुवातील पॉल आणि तिच्या आईने आमच्या दोघांमध्ये काही सुरू नसल्याचं नाकारलं होतं. पण, जेव्हा मुलाला जन्म दिला तेव्हा आम्ही दोघांनी लग्न केल्याचं कबूल केलं. त्यानंतर संतापलेली लॉरेननं पॉलला सोडून दिलं.

आईनेच दिला मुलीला धोका

जेव्हा माझ्यासोबत असं काही घडलं हे मला न कळण्यापलीकडे होतं. माझं आयुष्यचं संपून गेलं. ज्या आईने मला जन्म दिला. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला त्यानेच मला धोका दिला. माझ्या आयुष्यातला हा सर्वात वाईट क्षण होता. जी आई आपल्या मुलीचाच संसार उद्ध्वस्त करते, की कोणत्याही माफीच्या लायक नाही. मी दोघांनाही माफ करणार नाही, , असा संताप लॉरेनने व्यक्त केला.

First published: January 19, 2020, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading